सांगोला तालुक्यात शेकाप, शिंदे गट, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

सांगोला (नाना हालंगडे) : सांगोला तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका पैकी पाचेगाव खुर्दची निवडणूक बिनविरोध झाली असून, उर्वरित पाच ग्रा.पं. च्या निवडणुकीसाठी जोरात घमासान सुरू आहे. देशात व राज्यातील सत्तेत व दबदबा असलेला भाजप पक्ष कोठेच दिसत नाही. सर्वत्र शेकाप विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट यांच्यामध्येच लढत होत असल्याने जि.प. व पं. स. च्या निवडणुकीपूर्वीची ट्रायल… Continue reading सांगोला तालुक्यात शेकाप, शिंदे गट, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

मैत्रिणीनेच वाचविला मैत्रिणीचा जीव

सांगोला (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिंतूर येथे शेतातील विहिरीत पडलेल्या एका मुलीला पोहता न येणाऱ्या मैत्रिणीने वाचवण्याची कामगिरी बजावली. मैत्रिणीवर आलेले मृत्यूचे गंडांतर टाळण्यात तिच्या मैत्रिणीला झटपट व धाडसी कृतीमुळे यश आले. कोरवाडी येथील अश्विनी आलाटे हिच्यामुळे बुडणाऱ्या कोमल आलाटे या मैत्रिणीला चक्क पुनर्जन्म मिळाला आहे. अश्विनी आलाटे आणि कोमल आलाटे या दोघी मैत्रिणी कोरवाडी गावच्या… Continue reading मैत्रिणीनेच वाचविला मैत्रिणीचा जीव

अनकढाळचा टोलनाका स्थानिकांसाठी त्रासदायक

सांगोला (नाना हालंगडे) : सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथील टोलनाका स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे. अनेक स्थानिकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यातून सूट दिली जात नाही. त्यामुळे हा टोलनाका तालुकावासीयांच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. मालक बदलला आहे, अशी बतावणी करून टोल कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांची लूटमार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या सांगोला तालुक्यात कोळा, जुनोनी, पाचेगाव तसेच संगोल्याहून… Continue reading अनकढाळचा टोलनाका स्थानिकांसाठी त्रासदायक

डिकसळ आश्रमशाळा व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील आश्रमशाळेच्या मुलींच्या १४ आणि १७ वर्षे वयोगटातील संघाने व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने मोठ्या फरकाने जिंकत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. याच दोन्ही संघांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, जिल्ह्यात डिकसळकरांचा दबदबा पाहावयास मिळाला आहे. डिकसळ येथील आश्रमशाळा म्हणजे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी गावाला दिलेली देणगी आहे. शिक्षणाबरोबरच… Continue reading डिकसळ आश्रमशाळा व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

पंढरपुरात आलेल्या भाविकांना विषबाधा

पंढरपूर (प्रतिनिधी)  : पंढरपूरमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या भाविकांना अन्नांतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भाविकांना जेवल्यानंतर अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील सुमारे ३० पेक्षा अधिक नागरिकांना जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या अन्नपूर्णा… Continue reading पंढरपुरात आलेल्या भाविकांना विषबाधा

सोलापूर जिल्ह्यातील २८ गावांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येथील गावकऱ्यांनी बोम्मईंना फॅक्सही पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयाचा फॅक्स कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पाठवला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगचेच तापले आहे. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही… Continue reading सोलापूर जिल्ह्यातील २८ गावांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय

विठुराया एक महिन्याच्या सुट्टीवर

पंढरपूर (प्रतिनिधी) : दररोजच्या जीवनातील थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांती घेतात. हीच अवस्था देवाची देखील होत असेल का? या विश्रांतीसाठीच सध्या विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जात आहे. या परंपरेनुसार सांगितले जाते की, मार्गशीर्ष महिना हे देवाचा विश्रांती काळ असून, चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णूपदावर देव… Continue reading विठुराया एक महिन्याच्या सुट्टीवर

गुंजेगाव येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथील विजया महिला दूध संस्थेच्या गोकुळच्‍या क्लस्टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्ते तसेच सोलापूर विधानपरिषदचे माजी आ. प्रशांत परिचारक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाले. यावेळी प्रशांत परिचारक म्‍हणाले, १५ हजार लिटर्स क्षमतेच्या या बल्‍क कुलरमुळे मंगळवेढा परिसरातील संपूर्ण दूधाचे याठिकाणी संकलन… Continue reading गुंजेगाव येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

error: Content is protected !!