कोल्हापूर हायकर्सच्या वतीने पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा…

पन्हाळा (प्रतिनिधी) : इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर सोमेश्वर तलाव, छ. संभाजी मंदिर, छ. शिवाजी मंदिर याठिकाणी दिपावलीच्या पूर्व संध्येला कोल्हापूर हायकर्स यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय, तेच गड-किल्ले सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात… Continue reading कोल्हापूर हायकर्सच्या वतीने पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा…

दिवाळी : तेजोमय प्रकाशपर्व

श्रीधर वि. कुलकर्णी दिवाळीचा सण म्हणजे तेजोमय प्रकाशपर्व तसेच असत्यावर सत्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होय. हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीकच नाही तर त्याचे सामाजिक, आध्यात्मिक,  ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व देखील आहे. हा सण सामाजिक ऐक्य वाढवण्याचे काम करतो. कार्तिक कृष्ण त्रयोदशीपासून दिवाळीचा सण साजरा केला जातो. भगवान राम रावणाचा वध करून व… Continue reading दिवाळी : तेजोमय प्रकाशपर्व

अंबाबाई मंदिर आवारात सवत्स गायीचे पूजन

कोल्हापूर : येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आवारात गरुड मंडप परिसरात वसुबारसनिमित्त सवत्स गायीची विधिवत पूजा देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी गणेश नेर्लेकर-देसाई, देवस्थानचे पुजारी पंकज दादरणे, प्रमोद उपाध्ये आणि देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते. वसुबारसनिमित्त अंबाबाई देवीची सवत्स गोद्वादशी पूजा बांधण्यात आली होती.… Continue reading अंबाबाई मंदिर आवारात सवत्स गायीचे पूजन

‘वसुबारस’निमित्त अंबाबाई देवीची बांधलेली पूजा

‘वसुबारस’निमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची बांधण्यात आलेली आकर्षक पूजा. यामध्ये अंबाबाई देवी सुपातून धान्य देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

आयुर्वेदाची देवता ‘धन्वंतरी’

महाराष्ट्रात दिवाळीचा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस असतो वसुबारस! धनत्रयोदशी हा दिवस आश्विन महिन्याच्या त्रयोदशीला असतो. या दिवसाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व देखील मोठे आहे. धन्वंतरी हे चारभुजा धारी होते. त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ/जळू, एका हातामध्ये औषधी कलश (अमृत कलश), एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख… Continue reading आयुर्वेदाची देवता ‘धन्वंतरी’

शिवाजी विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांची दिवाळी साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात प्रवेशित परदेशी विद्यार्थ्यांची दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी साजरी करण्यात आली. यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे काल रात्री आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या अतिथीगृहात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमस्थळी परदेशी विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच आकर्षक रांगोळी, छोटे-मोठे कंदील लावून सजावट करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी परिसरात पणत्या प्रज्वलित करून प्रकाशाच्या या… Continue reading शिवाजी विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांची दिवाळी साजरी

वसुबारस : जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस

श्रीधर वि. कुलकर्णी भारतात विविध राज्यांमध्ये संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. गाई, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस! उद्या शुक्रवारी वसुबारस असून,… Continue reading वसुबारस : जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस

दिवाळी खरेदीच्या उत्साहाला पावसाचा ब्रेक !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. कोरोनानंतर प्रथमच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. घरोघरी गृहिणींची लगबग सुरु आहे. विविध प्रकारचे कपडे, फराळाचे पदार्थ, वस्तूंनी बाजारपेठ सजल्या आहेत; मात्र सध्या रोजच केव्हाही कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. महाद्वार रोड, राजारामापुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड या परिसरात… Continue reading दिवाळी खरेदीच्या उत्साहाला पावसाचा ब्रेक !

रांगोळीमध्ये दुर्गा दौड उत्साहात

रांगोळी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ९ दिवस दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दौडच्या शेवटच्या दिवशी मुलींना ध्वजाचा मान देण्यात आला होता. नवरात्र उत्सवाचे काळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देशभरात दुर्गा दौड काढण्यात येते. आजच्या काळातील तरुणांच्या मनामध्ये शिवविचार व देशभक्ती जागृत करण्याचे उद्देशाने दौडचे आयोजन करण्यात आले होते. या… Continue reading रांगोळीमध्ये दुर्गा दौड उत्साहात

शिरोळ येथे ऐतिहासिक दसरा उत्सव उत्साहात

शिरोळ (प्रतिनिधी) : येथील शिवाजी तख्त येथून शिवकालीन ऐतिहासिक जय भवानी तोफ ही फुलांनी सजवून शहरातील मुख्य रस्त्यावरून वाद्याच्या गजरात व दोन बैल जोडीच्या साह्याने दसरा चौक येथे आणण्यात आली. येथे शिवकालीन जय भवानी तोफेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते तोफेच्या फैरी उडवण्यात आल्या. या नंतर येथील ग्रामस्थांकडून सोने लुटण्यात आले. शिरोळ येथील ऐतिहासिक दसरा उत्सव… Continue reading शिरोळ येथे ऐतिहासिक दसरा उत्सव उत्साहात

error: Content is protected !!