तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात

तुळजापूर : श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीच्या पालखीचा विसावा घेऊन पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई… Continue reading तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात

शिवसेना महिला आघाडीतर्फे नवदुर्गा दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवानिमित्त महिला आघाडीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘बये दार उघड’ या मोहिमेंतर्गत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कोल्हापूरमधील नवदुर्गाचे दर्शन घेत महिलांशी संवाद साधण्यात आला. नवदुर्गा ज्योत दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवतीर्थवर नेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी त्र्यंबोली देवी, अनुगामिनी, एकविरा यमाई देवी, कमलजा (कमलांबिका देवी), कळंबी देवी, श्री मुक्तांबिका,… Continue reading शिवसेना महिला आघाडीतर्फे नवदुर्गा दर्शन

‘विजयादशमी’ : आनंद, उत्साह आणि प्रेरणोत्सव

श्रीधर वि. कुलकर्णी ‘विजयादशमी’ हा दिवस विजयाचा असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. अशी मान्यता आहे की, साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही दिवशी कार्य प्रारंभ झाल्यास त्यात नक्कीच यश मिळते. दसरा सण हा लोकांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह आणतो, तसेच त्यांना एक चांगला संदेश देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.… Continue reading ‘विजयादशमी’ : आनंद, उत्साह आणि प्रेरणोत्सव

मल्हारपेठ येथे अपूर्व उत्साहात दुर्गामाता दौड

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथे आठव्या दिवशी राजर्षी शाहू, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौड अपूर्व उत्साहात पार पडली. युवक-युवती, पुरुष-महिला, ग्रामस्थ, शिवभक्त यांच्या वतीने दुर्गामाता दौडचा प्रारंभ सकाळी ६ वा. श्री शिवछत्रपती प्रतिमेचे व ध्वजाचे पूजन करून शिवाजी चौकातून करण्यात आला. नवरात्रोत्सव काळात ठिकठिकाणी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात… Continue reading मल्हारपेठ येथे अपूर्व उत्साहात दुर्गामाता दौड

अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आठव्या दिवशी आज सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. दरम्यान, अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यातून दररोज लाखो भाविक येत असल्याने कोल्हापूर शहर हाऊसफुल्ल झाले आहे. महाअष्टमी तिथीला सर्व देवांच्या तेजातून प्रकटलेल्या अष्टादशभुजा महालक्ष्मी अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात परब्रम्हाची… Continue reading अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा

सावर्डे येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे, मल्हारपेठ व मोरेवाडी या तिन्ही गावचे ग्रामदैवत असणाऱ्या सावर्डे येथील जोतिर्लिंग मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नऊ दिवस सकाळी काकड आरती होऊन जोतिबाची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा बांधण्यात येते. सायंकाळी, भजन, कीर्तन व पालखी इत्यादींचे आयोजन केले जाते. परिसरातील १५० भाविकांनी नवरात्रीचा उपवास धरला आहे. परिसरातून भाविक मोठ्या… Continue reading सावर्डे येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

जोतिबाची द्विदल कमळपुष्पातील खडी महापूजा

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी श्रींची द्विदल कमळपुष्पातील खडी महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती. जोतिबाच्या नावानं ‘चांगभलं’च्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले. नवरात्र उत्सवानिमित्त जोतिबा डोंगरावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

कुंभोज येथे नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ

कुंभोज (प्रतिनिधी) : येथे नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. आज सकाळी सातपासून अनेक सार्वजनिक दुर्गा माता मंडळांनी आपापल्या दुर्गा मातेच्या मूर्ती नेण्यासाठी कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कुंभोज येथे जवळजवळ आठ ठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. दुर्गा मातेची मूर्ती नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्गानी डोक्यावर पाण्याचा कलश घेतले होते.… Continue reading कुंभोज येथे नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ

तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव मंगलमय वातावरणात सुरु

तुळजापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून मंगलमय वातावरणात सुरु झाला आहे. दोन वर्षांनंतर कोरोनाचे निर्बंध हटल्याने उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाली आहे. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. पहाटे… Continue reading तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव मंगलमय वातावरणात सुरु

कोल्हापुरातील नवदुर्गा

श्रीधर वि. कुलकर्णी २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. अनेक ठिकाणी देवीची आराधना केली जाते. अंबाबाईसोबतच कोल्हापूर परिसरात देवीची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. यांना एकत्रित नवदुर्गा असे संबोधतात. नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेताना आपोआपच कोल्हापूर शहराची प्रदक्षिणाही पूर्ण होते. एकांबिका (एकविरा… Continue reading कोल्हापुरातील नवदुर्गा

error: Content is protected !!