नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाच्या रचनेची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतले आहेत. तत्पूर्वी आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ कसे असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे. यावर ट्वीटद्वारे  स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे… Continue reading नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाच्या रचनेची चर्चा

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे ?

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे येणार की जयंत पाटील यांच्याकडे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी… Continue reading विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे ?

राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने सुरू झालेले महाराष्ट्रातील सत्तानाट्य बुधवारी रात्री संपुष्टात आले. विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे यांनी रात्रीतूनच बंडखोर आमदारांसह महाराष्ट्र सोडला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाने नऊ दिवस शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्षाचे राजकीय नाट्य पाहिले. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचे केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असे सरकत गेले आणि उद्धव ठाकरेंच्या… Continue reading राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम

औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा प्रस्ताव मंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादसह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवले गेली. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामकरण होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील हे नाव आता देण्यात येणार आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर… Continue reading औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा प्रस्ताव मंजूर

उद्धव ठाकरे वाजपेयींचा कित्ता गिरवणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण विश्वासदर्शक ठरावात पराभूत होण्याची कुणकूण लागली आहे. त्यामुळे जर बुधवारी सायंकाळी सुप्रीम कोर्टाचा निकाल शिवसेनेच्या विरोधात लागला आणि उद्या गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास मुख्यमंत्री ठाकरे फ्लोअर टेस्ट न करता थेट भाषण करून राजीनामा देण्याची शक्यता आहे. सध्याची स्थितीत पाहता शिंदे गट वेगळा गेल्यामुळे राज्यातील महाविकास… Continue reading उद्धव ठाकरे वाजपेयींचा कित्ता गिरवणार ?

विश्वासदर्शक ठरावासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी : भाजप

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपनेही जोरदार तयारी चालवली आहे. विधान भवनातील व्यवस्थेसंदर्भात भाजपचे प्रवीण दरेकर व सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व विधान भवन सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रवीण दरेकर आणि मी… Continue reading विश्वासदर्शक ठरावासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी : भाजप

किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असताना दुसरीकडे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून, या पत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून, त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर… Continue reading किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाच्या संरक्षणासाठी भाजप सतर्क

मुंबई (प्रातिनिधी) : एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या संरक्षणासाठी भाजपा सज्ज झालं आहे. शिवसेना उद्या आक्रमक झाली तर भाजप देखील देणार जशास तसे उत्तर देण्याची तयारी करत आहे. शिंदे गट उद्या मुंबईत येणार असल्याने शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे; मात्र या शिंदे गटातील आमदारांसाठी भाजपने देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी केली. शिंदे गटाच्या समर्थनासाठी आता छावा संघटना… Continue reading शिंदे गटाच्या संरक्षणासाठी भाजप सतर्क

हा अन्यायच नाही, तर घटनेची पायमल्ली : राऊत

मुंबई (प्रतिनिधी) सोळा आमदार निलंबन प्रकरणी दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदत देते आणि राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन एक दिवसात बोलावतात, हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत… Continue reading हा अन्यायच नाही, तर घटनेची पायमल्ली : राऊत

ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई (प्रतिनिधी) :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाने आता वेगळे वळण घेतले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारने बहुमत गमावले असे मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले… Continue reading ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

error: Content is protected !!