महापालिका निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना, शिवसेनेला धक्का

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे सरकारने उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून, आता २०१७ सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली असून, यामध्ये मुंबईतील वाढलेल्या ९ वॉर्डचा समावेश आहे. आज (बुधवार) झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय… Continue reading महापालिका निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना, शिवसेनेला धक्का

गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे

मुंबई (प्रतिनिधी) : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सात वर्षांनी एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी बॉम्बे हायकोर्टाच्या संमतीने एसआयटीकडून एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एसआयटीतले काही अधिकारी एटीएसला त्यांच्या तपासात सहकार्य करणार आहे. २०१५ पासून एसआयटीला पानसरे हत्या प्रकरणात अपेक्षित यश मिळत नसल्याने हा तपास एटीएसकडे सोपवण्यात यावा, अशी विनंती पानसरे कुटुंबाने केली होती.… Continue reading गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे

रविवारपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार

मुंबई : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून पावसाचा नवा अंदाज देण्यात आला आहे. पुढचे ४ दिवस राज्यात असेच हवामान राहील; पण रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रविवारपर्यंत उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. हवामान खात्याने सांगितले की, मुंबईत काही… Continue reading रविवारपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार

संजय राऊत यांना गुरुवारपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने  गुरुवार, दि. ४ ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने रविवारी तब्बल ९ तास संजय राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची… Continue reading संजय राऊत यांना गुरुवारपर्यंत ईडीची कोठडी

नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्रातील शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे’ हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलेले वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. देशातील सर्वच लोकांनी आपले कान, डोळे उघडे ठेवून देश कुठे चालला आहे, हे पहायला हवे. देशाला हुकूमशाहीकडे नेण्यासाठी भाजपला मदत करायची की नाही, यावर सामान्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव… Continue reading नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे : उद्धव ठाकरे

राज्यपालांचे वक्तव्य दाबण्यासाठी राऊत यांना अटक

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले होते. या वादावरील सर्वांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली, असा दावा शिवसेनेने केला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते; पण गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी… Continue reading राज्यपालांचे वक्तव्य दाबण्यासाठी राऊत यांना अटक

मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता : कोश्यारी

मुंबई (प्रतिनिधी) : ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या… Continue reading मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता : कोश्यारी

राज्यपालांनी जनतेची माफी मागावी : नाना पटोले

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान कोश्यारी यांनी केले होते. यासंदर्भात आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यात… Continue reading राज्यपालांनी जनतेची माफी मागावी : नाना पटोले

राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलीय : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे तूप पाहिले; पण कोल्हापूरचा जोडा पाहिला नाही. त्यामुळे लवकरच त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी… Continue reading राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलीय : उद्धव ठाकरे

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही : फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये व वाटचालीमध्ये मराठी माणसांचे जे कार्य व श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रासह जगभरात मराठी माणसांचे नाव मोठे आहे,’ असे ते म्हणाले. ‘राज्याच्या विकासातील वेगवेगळ्या समाजाचे योगदान… Continue reading राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही : फडणवीस

error: Content is protected !!