कोल्हापूरकरांचे दातृत्व : ‘शेणी दान’चा ओघ सुरूच..!

विद्यापीठ हायस्कूलच्या १९९३ बॅचकडून १० हजार शेणी दान कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यापीठ हायस्कूलच्या १९९३च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा स्मशानभूमीस अंत्यसंस्कारासाठी आज (मंगळवार) १० हजार शेणी उपमहापौर संजय मोहिते यांच्या उपस्थितीत दान केल्या. यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, चेतन चव्हाण,  सुमंत कुलकर्णी, महेश पाटील, अमर माने, विश्वनाथ तेली, शरद कोथळकर, आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे, कर्मचारी… Continue reading कोल्हापूरकरांचे दातृत्व : ‘शेणी दान’चा ओघ सुरूच..!

तलाठी-ग्रामसेवकांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे : दौलत देसाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तलाठी आणि ग्रामसेवक यांनी आप-आपल्या गावचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज करावे. गावात रुग्ण कसा वाढणार नाही यासाठी ग्राम समित्यांना सक्रीय करुन नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) दिले. जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी आज संवाद साधला.… Continue reading तलाठी-ग्रामसेवकांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे : दौलत देसाई

इचलकरंजीच्या नगराध्यक्षांसह सदस्यांवर दंडात्मक कारवाई

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेनं व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वसाधारण सभा घेतली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत अनेक सदस्य या सभेसाठी एकत्र जमल्यानं मुख्याधिकार्‍यांनी नगराध्यक्षांसह उपस्थित 45 सदस्यांना प्रत्येकी 200 रुपये दंड भरण्याच्या नोटीसा धाडल्या आहेत. दरम्यान, आम्ही लोकसेवक असून जनतेच्या हिताचे प्रश्‍न मांडण्यासाठी सभेस उपस्थित होतो. त्यामुळं दंड आकारण्याचा प्रश्‍न उद्भवत नसल्याचं सांगत काही सदस्यांनी… Continue reading इचलकरंजीच्या नगराध्यक्षांसह सदस्यांवर दंडात्मक कारवाई

लक्ष विचलित करण्याचा महापौरांचा केविलवाणा प्रयत्न : भाजपा-ताराराणी आघाडी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यमान भूवापर नकाशा करण्यासाठी एजन्सी नेमण्याच्या टेंडर प्रकियेत महापौरांनी बेकायदेशीर हस्तक्षेप केला आहे. भ्रष्टाचाराबाबत भाजपा-ताराराणी आघाडीने केलेल्या आरोपांवर महापौरांनी जो खुलासा केला आहे तो केवळ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असल्याचे आघडीने सांगितले. कोल्हापूर शहराची तिसरी विकास योजना 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु त्याकरीता आवश्यक असलेला… Continue reading लक्ष विचलित करण्याचा महापौरांचा केविलवाणा प्रयत्न : भाजपा-ताराराणी आघाडी

आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर बसवणार : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात १०० बेड क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर बसवण्याची सोय करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवारी) सांगितले. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन बेडच्या नियोजनासंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, भविष्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता गृहित धरुन आरोग्य… Continue reading आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर बसवणार : पालकमंत्री

जमीन विक्रीस इच्छुकांनी संपर्क साधावा : बाळासाहेब कामत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. ज्या जमिन मालकास शासनाने निश्चित केलेल्या जमिनीच्या दरानुसार किंवा जिरायत जमिन कमान ५ लाख प्रति एकर व बागायत जमीन कमाल ८ लाख रूपये प्रति एकर प्रमाणे विक्री करावयाची आहे, अशांनी जमिनीच्या सात बारा आणि आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त,… Continue reading जमीन विक्रीस इच्छुकांनी संपर्क साधावा : बाळासाहेब कामत

मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसले : स्वप्नील पार्टे (व्हिडिओ)

मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगती दिली आहे. ती स्थगिती उठवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना सकल मराठा समाजातर्फे सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले.  

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयुक्तांनी घेतला उपाययोजना आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक उपाययोजना राबवूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हेबएक्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समन्वय अधिकारी आणि प्रभाग समिती सचिव यांना अधिक गतीशीलतेने अहोरात्र काम करण्याची सूचना आयुक्त कलशेट्टी यांनी… Continue reading कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयुक्तांनी घेतला उपाययोजना आढावा

होम आयसोलेटेड रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी होम आयसोलेटेड रुग्णांवर आता महापालिका व पोलिस पथकांचा वॉच राहणार आहे. कोरोनाबाधित होम- आयसोलेटेड रुग्णांच्या घरी अचानक भेटी देऊन होम आयसोलेटेड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. शहरातील वाढता कोरोना संसर्ग विचारात घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना… Continue reading होम आयसोलेटेड रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक असून गेल्या तीन दिवसात पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड केला असल्याची माहिती आयुक्त्‍ डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व्यापक उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहे. आयुक्त डॉ. कलशेटटी म्हणाले की, कोरोनाचा प्रसार… Continue reading महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त

error: Content is protected !!