पंतप्रधानांकडून युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द

दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला; मात्र प्रत्येक वेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचे एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असे म्हटले जाते; पण आता भारतीय नौदलाच्या नवा ध्वजावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी… Continue reading पंतप्रधानांकडून युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणाची माहिती द्या : मनसे

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेमधून आजपर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून किती लोकांना कर्ज प्रकरणे वाटप करण्यात आली, किती कर्जदारांचे मागणी अर्ज आले आहेत व पेंडिंग प्रकरणे कोणत्या कारणाने मागे ठेवली आहेत; याची माहिती मिळावी, अशी मागणी मनसेने केली आहे. यावेळी संदीप शेलार,… Continue reading अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणाची माहिती द्या : मनसे

खात्यांतर्गत पोलिसांना २० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे-फडणवीस सरकारने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना मोठं गिफ्ट दिले आहे. आता कॉन्स्टेबल रॅंकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यापूर्वी ठाकरे सरकारने डीजी लोन ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय… Continue reading खात्यांतर्गत पोलिसांना २० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार

मोदी स्वत:च्या खिशातून करतात खानपानाचा खर्च

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या खानपानाचा खर्च स्वत:च्या खिशातून करतात. सरकारी बजेटमधून त्यांच्या खानपानावर एक रुपयाही खर्च केला जात नाही, अशी माहिती आरटीआयमधून देण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या पगाराची, स्टाईलची जितकी चर्चा होते तितकी त्याच्या खानपानाचीही चर्चा रंगते. यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींवर सरकारच्या तिजोरीतून होणाऱ्या एकूण खर्चाबाबत आणि खास सुविधांबाबत प्रश्न  उपस्थित केले… Continue reading मोदी स्वत:च्या खिशातून करतात खानपानाचा खर्च

कागलच्या अतिक्रमित झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण त्वरित करा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल शहरातील सर्व अतिक्रमित झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्यासाठी अधिकार्‍यांनी युद्ध पातळीवर कार्यवाही करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने या झोपडपट्ट्यातील अतिक्रमणे नियमितीकरण, कागल तालुक्यातील संजय गांधी… Continue reading कागलच्या अतिक्रमित झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण त्वरित करा : चंद्रकांत पाटील

विमानतळ विस्तारीकरण : मौजे मुडशिंगीत जमीन संपादन सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी करवीर तालुक्यातील मौजे मुडशिंगी येथील क्षेत्र २५.९९.२० हेक्टर आर चौरस मीटर जमीन संपादनाची कार्यवाही सुरु आहे. मौजे मुडशिंगी येथील बाधित खातेदारांसोबत करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली मौजे मुडशिंगी येथील खातेदारांच्या बैठकीत खासगी जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यासाठी सकारात्मक चर्चा होऊन ११३ बाधित खातेदारांनी त्यांची जमीन विमानतळ विस्तारीकरणासाठी… Continue reading विमानतळ विस्तारीकरण : मौजे मुडशिंगीत जमीन संपादन सुरु

हातकणंगले येथे २९ ऑगस्ट रोजी नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ हातकणंगले तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तहसील कार्यालय, हातकणंगले येथे सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ पर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या… Continue reading हातकणंगले येथे २९ ऑगस्ट रोजी नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

वैयक्तिक, सामूहिक योजनाच्या साहित्याची तपासणी होणार : सीईओ

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत गावोगावी राबविण्यात आलेल्या वैयक्तिक व सामूहिक योजनाच्या साहित्याची वेगवेगळ्या यंत्रणेमार्फ़त तपासणी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी जाहीर केले आहे. समाजकल्याण समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी हे साहित्य खरेदी करुन ते कशाप्रकारे वापरले आहे किंवा नाही.… Continue reading वैयक्तिक, सामूहिक योजनाच्या साहित्याची तपासणी होणार : सीईओ

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी शनिवार, दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या… Continue reading कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ : मुख्यमंत्री

घरून काम करणे महिलांसाठी उपयुक्त : मोदी

नवी दिल्ली : घरून काम करणे महिलांसाठी उपयुक्त ठरू शकते. देशाच्या उभारणीत आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कामगार मंत्रालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत एक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि याचे सर्वाधिक श्रेय आपल्या कामगारांना जाते. देशाच्या विकासात श्रमशक्तीचे मोठे योगदान केंद्रीय… Continue reading घरून काम करणे महिलांसाठी उपयुक्त : मोदी

error: Content is protected !!