नवी दिल्ली : घरून काम करणे महिलांसाठी उपयुक्त ठरू शकते. देशाच्या उभारणीत आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कामगार मंत्रालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारत एक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि याचे सर्वाधिक श्रेय आपल्या कामगारांना जाते. देशाच्या विकासात श्रमशक्तीचे मोठे योगदान केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने आंध्र प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कामगार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

विकसित भारत बनवण्याचे स्वप्न साकार करण्यात देशातील श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांसाठी देश अखंड कार्यरत आहे. महिला कामगार दलाच्या सहभागासाठी आपण लवचिक कामाच्या ठिकाणासारख्या प्रणालींचा वापर करू शकतो. देशाचे श्रम मंत्रालय अमृतकलमध्ये २०४७ वर्षासाठी आपले व्हिजन तयार करत आहे. कामाचे ठिकाण आणि वेळ घरातून काम करणे हे भविष्यात महत्वाची ठरणार आहे. तसेच नवीन कायद्यांनुसार आठवड्यातील कामकाजाचे दिवस ही कमी होणार आहेत, असेही मोदी म्हणाले.