कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत

मुंबई (प्रतिनिधी) : संचालकांचा मनमानी कारभार आणि त्यांनी केलेला सुमारे ३१० कोटींचा अपहार यामुळे अडचणीत आलेल्या कराड जनता सहकार बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेने केली आहे. आज (मंगळवार) याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. तसेच हा आदेश आल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सभासद आणि ठेवीदारांमध्ये गोंधळ उडाला असून ते… Continue reading कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत

गुड न्यूज : तीन कोरोना लसींना लवकरच परवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवार) संयुक्त पत्रकार परिषद घेत कोरोना संबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर घोषणा केली. संशोधकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणाल लसींचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच तीन लसींना परवाना देण्याचा विचार सरकार करत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. या लसींपैकी सर्वांना किंवा एकाला तरी लवकरात लवकर परवाना मिळण्याची शक्यता… Continue reading गुड न्यूज : तीन कोरोना लसींना लवकरच परवाना

‘राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले…’

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कामगिरीत सातत्य नाही असे विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले होते. यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी आघाडीतील पक्षांनी आघाडी धर्माचे पालन करावे, असा इशारा दिला होता. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही शरद पवार यांचेवर निशाणा साधला आहे. पवार हे… Continue reading ‘राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले…’

सरकारकडून फडणवीस टार्गेट : ‘जलयुक्त शिवार’च्या चौकशीसाठी समिती नियुक्त

मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार, आता सरकारकडून निवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून ही समिती सहा जिल्ह्यातील ११२८ कामांची चौकशी करणार आहे. यामुळे फडणवीस यांच्या अडचणीत… Continue reading सरकारकडून फडणवीस टार्गेट : ‘जलयुक्त शिवार’च्या चौकशीसाठी समिती नियुक्त

‘कोणी कितीही लॉबिंग करू दे, कोरोना लस कोणाला पहिल्यांदा द्यायची ते ठरलंंय…’

मुंबई (प्रतिनिधी) : पुढील काही महिन्यांत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. या लसीसाठी कोणी कितीही लॉबिंग करावे, राज्य सरकारने मात्र कोणाला लस प्रथम द्यायची ते ठरवले आहे. सर्वप्रथम आम्ही पोलीस आणि डॉक्टरांना लस देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (मंगळवार) जाहीर केले. अनेक कंपन्या कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारतात ही लस… Continue reading ‘कोणी कितीही लॉबिंग करू दे, कोरोना लस कोणाला पहिल्यांदा द्यायची ते ठरलंंय…’

शिवसेना नेता म्हणतो, ‘महाविकास आघाडीच्या नव्हे, अपक्ष उमेदवाराला मतदान करा..?

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह मित्रपक्षांची महाविकास आघाडी आणि भाजप व मित्रपक्ष यांच्यात थेट लढत होत आहे. त्याचप्रमाणे काही वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. असे असताना शिवसेनेच्या एका नेत्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी चक्क अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याची ऑडिओ क्लीप… Continue reading शिवसेना नेता म्हणतो, ‘महाविकास आघाडीच्या नव्हे, अपक्ष उमेदवाराला मतदान करा..?

‘पुणे पदवीधर, शिक्षक’साठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांंवर उद्या मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) १ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तैनात करण्यात आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप मित्रपक्षांमध्ये लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ… Continue reading ‘पुणे पदवीधर, शिक्षक’साठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांंवर उद्या मतदान

…तर जयंत पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाले असते : नारायण राणे

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी जर राज्यात भाजपचे सरकार असते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, एवढेच नव्हे, मंत्रीपदावर असते, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. ते आज (सोमवार) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत जयंत पाटील… Continue reading …तर जयंत पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाले असते : नारायण राणे

‘कोविशील्ड’वरील आरोप चुकीचे ; ‘त्याच्या’वर १०० कोटींचा दावा लावणार ! : ‘सीरम’चा इशारा

पुणे (प्रतिनिधी) :  ‘कोविशील्ड’ लसीवर चेन्नईतील स्वयंसेवकाने घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत. त्याने संस्थेवर केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे संस्थेची बदनामी झाली असून त्याच्याविरोधात १०० कोटी नुकसानभरपाईचा दावा करणार असल्याचा इशारा सीरम इन्स्टिट्यूटनं दिला आहे. ‘कोव्हिशील्ड’ ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकन कंपनी ‘अॅस्ट्राझेनेका’ विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. या लसीची… Continue reading ‘कोविशील्ड’वरील आरोप चुकीचे ; ‘त्याच्या’वर १०० कोटींचा दावा लावणार ! : ‘सीरम’चा इशारा

कोरोना लसीबाबत ‘सीरम’च्या आदर पूनावालांचा महत्त्वपूर्ण खुलासा…

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सीरम इन्स्टिट्यूटला दिलेल्या भेटीत कोरोनावरील लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम आपल्या देशातच होणार आहे. सुरुवातीस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल, असा  महत्त्वपूर्ण खुलासा ‘सीरम’चे संचालक आदर पूनावालांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच देशात ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता… Continue reading कोरोना लसीबाबत ‘सीरम’च्या आदर पूनावालांचा महत्त्वपूर्ण खुलासा…

error: Content is protected !!