मुंबई – बॉर्डर या सिनेमाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘स्वातंत्र दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ यादिवशी देशभक्तीपर गीत लावले जातात. त्यामध्ये ‘संदेसे आते हैं’ हे गाणं तर हमखास लावलं जातं. हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ‘संदेसे आते हैं’ हे गाणं ऐकताना ज्या चित्रपटातलं हे गाणं आहे, त्यातलं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. आज ही गाणे लोकांच्या तोंडात आहे. १९९७ रोजी प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटातलं हे गाणं आहे. ज्याप्रमाणे चित्रपटातील गाणी गाजली त्याचप्रमाणे चित्रपटासुद्धा प्रचंड गाजला. आजही प्रेक्षक आवर्जून हा चित्रपट बघतात. जेव्हा ही हा सिनेमा बघताना गर्व भासत नाही असे कधीच होत नाही. या चित्रपटातून इंडियन आर्मीच आयुष्य त्यांच्या आयुष्यातील आव्हान दाखवले आहे. आता या सिनेमाचा लवकरच ‘ सिक्वल येणार आहे. ‘बॉर्डर २’ ची घोषणा करण्यात आली आहे.

तब्बल २७ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ‘बॉर्डर’ चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सिक्वेलची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. नुकताच चित्रपटाचा प्रोमो रिलीज झालेला आहे. या प्रोमोमध्ये, २७ वर्षांपूर्वी एका फौजीने शब्द दिला होता की, तो पुन्हा येईल. दिलेला शब्द पूर्ण करत आता तो फौजी परत येतोय. “संदेसे आते है, हमे तडपाते है” हे गाणं त्या प्रोमोमध्ये नव्या रुपात ऐकायला मिळत आहे.

बॉर्डर २’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करणार आहेत. तर अनुराग सिंह ‘बॉर्डर २’चे दिग्दर्शन करणार आहेत. ‘बॉर्डर २’साठी अनु मलिक, मिथुन संगीत देणार आहेत जावेद अख्तर या चित्रपटासाठी गाणी लिहिणार आहेत. तर सोनू निगम गाणे गाणार आहेत. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट समोर आलेली नाही.