पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथे श्री योगी प्रभुनाथ महाराज फौंडेशन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ जयंती उत्सवास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त नवनाथ ग्रंथ पारायणासह विविध धार्मिक, सांस्कृतिक, शेतीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये योगा, होमहवन, आरती, भजन असे विविध कार्यक्रम होणार आज (रविवार) सदगुरु आनंद काडसिद्वेशर महाराज (आसुर्ले) यांचे प्रवचन होणार आहे. तर उद्यापासून भावगीते, भक्तीगीते, बासरी वादन, गोकुळचे संचालक चेतन नरके यांचे शेती व दुग्ध व्यवसायावर व्याख्यान राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीकांत पाटील यांचा भारतीय संस्कार आणि संस्कृती विषयावर व्याख्यान, शाहिरी कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर दिनाक २७ रोजी गावातून पालखी सोहळा,  सांयकाळी कालभैरव श्री भैरवनाथ जन्मकाळ सोहळा तसेच मान्यवरांचा गुणगौरव सत्कार समारंभ होणार आहे.