कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्याने महायुतीचे नेते नाराज झाले होते. यातच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. तर तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रकाश आवडे यांची भेट घेतली होती. पण आवाडे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. तर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन आवाडे यांचे बंड थंड केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे प्रकाश आवडे यांना घेऊन धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

दरम्यान, प्रकाश आवाडे हातकलंगलेमधून निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंड यांनी याआधी आवाडेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण आवडे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असा निर्धार केल होता. पण आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची त्यांचा निवास्थानी भेट घेऊन माघार घेण्याची विनंती केली.

यावेळी हातकलंगले मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थंड केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आवाडे यांना घेऊन धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यामुळे प्रकाश आवाडे माघार घेणार असल्याचे स्पष्ट झाले असून धैर्यशील माने यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकाश आवडे यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले आहेत.