आता बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालतीय : सुरेश खोपडे

मुंबई (प्रतिनिधी) : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. यावरून माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना ‘बंटी बबली’ असे म्हणत निशाणा साधला आहे. याबाबत खोपडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गृहमंत्र्यांनी एका कनिष्ठ… Continue reading आता बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालतीय : सुरेश खोपडे

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे..? : काँग्रेस नेत्याचा टोला

मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा गोंधळ निर्माण झालेला आहे, असा टोला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्षपद भूषवायला पाहिजे, असे   संजय राऊत… Continue reading संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे..? : काँग्रेस नेत्याचा टोला

‘गोकुळ’ निवडणूक : उमेदवारांना २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आजपासून (गुरूवारी) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे स्वतंत्र बॅंक खाते असणे आवश्‍यक आहे. निवडणुकीचा खर्च या खात्यातून कऱणे बंधनकारक असून २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा असेल, अशा सूचना  निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत. या पत्रकात म्हटले आहे… Continue reading ‘गोकुळ’ निवडणूक : उमेदवारांना २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट : चर्चांना उधाण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. परमबीर सिंग यांनी महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.   … Continue reading सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट : चर्चांना उधाण

मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली, तर मी… : अनिल देशमुखांचे ट्विट

मुंबई (प्रतिनिधी) : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. दरम्यान, देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणी त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे. या ट्विट देशमुख यांनी म्हटले आहे की, मी माननीय मुख्यमंत्री… Continue reading मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली, तर मी… : अनिल देशमुखांचे ट्विट

शाहूवाडी- पन्हाळ्यातील नाराज शिवसैनिकांना मुश्रीफांनी केले ‘हे’ आवाहन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी- पन्हाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-  सरूडकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सव्वा वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलांमध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांचे प्रमुख सहकारी हंबीरराव पाटील – भेडसगावकर… Continue reading शाहूवाडी- पन्हाळ्यातील नाराज शिवसैनिकांना मुश्रीफांनी केले ‘हे’ आवाहन…

कितीही ‘पुढारी’ एकत्र आले तरी ‘गोकुळ’च्या मतदारांवर परिणाम होणार नाही ! : रवींद्र आपटे (व्हिडिओ)

आम्ही जे केले त्याची उत्पादकांना जाणीव…ज्यांनी ३० वर्षे भरभरून दिलं त्यांच्या विरोधात का जाता ?विरोधी आघाडीत काँग्रेस नव्हे, मुश्रीफ यांचाच प्रभाव !…मग त्या वेळी आबाजी आणि डोंगळेंनी कोट्यातून नोकरभरती का केली ? ‘गोकुळ’चे चेअरमन रवींद्र आपटे यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बातचीत करताना विविध मुद्द्यांवर अत्यंत सडेतोड मते मांडली.

महापालिकेने पाणीपुरवठा प्रश्नाबाबत तातडीने श्वेतपत्रिका काढावी : भाजपची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ  व मुबलक पाणीपुरवठा होत नाही. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची सद्य:स्थिती आणि ती पूर्ण कधी होणार याबाबत नागरिकांत संभ्रम असून महापालिकेने या विषयाची श्वेतपत्रिका लवकरात लवकर प्रसिद्ध करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचेकडे केली. शिष्टमंडळाने आज (बुधवार) डॉ. कादंबरी बलकवडे… Continue reading महापालिकेने पाणीपुरवठा प्रश्नाबाबत तातडीने श्वेतपत्रिका काढावी : भाजपची मागणी

कोल्हापूर कोरोना अपडेट : कोरोना रुग्णांची संख्या ‘६००’ च्या वर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७३ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात १४ जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. तसेच १,६६३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३०, आजरा तालुक्यातील २, भूदरगड तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील १०,… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : कोरोना रुग्णांची संख्या ‘६००’ च्या वर

राज्यात ‘या’ १५ जिल्ह्यात लवकरच लॉकडाऊन..?

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊनला सुरुवात झाली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय, रोजगार बुडाले, अर्थव्यवस्थेला जोरदार झटका बसला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार सुरक्षित वावराचे नियम जनतेच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतानाही काहीजणांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा कोरोनाचे संकट जास्तच गहिरे होत चालले आहे. राज्यात… Continue reading राज्यात ‘या’ १५ जिल्ह्यात लवकरच लॉकडाऊन..?

error: Content is protected !!