पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापुरातून शिरोलीला जाणाऱ्या मोटरसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रणजीत भुलर पाल (वय २५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी पुलावर घडला. उत्तप्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यातील भारीया गावचा रणजित पाल हा कुटुंबांसह कोल्हापूरत जाधववाडी इथे भाड्याच्या घरात राहत होता. तो… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

गोकुळ निवडणूक : महाडिकांच्या भेटीनंतरही आवाडेंची भूमिका गुलदस्त्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. सत्तारूढ आघाडीचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज (मंगळवार) इचलकरंजी येथे जाऊन आ. प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. पण त्यांच्या भेटीतून अद्याप तरी काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. प्रकाश आवाडे यांनी ‘गोकुळ’बाबत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून उत्सुकता वाढवली आहे. प्रकाश आवाडे यांनी… Continue reading गोकुळ निवडणूक : महाडिकांच्या भेटीनंतरही आवाडेंची भूमिका गुलदस्त्यात…

ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करा : राजू शेट्टी

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षापासून ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक झाली नसून तातडीने सदस्यांची नियुक्ती करून बैठक घेण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली. गतवर्षीच्या गळीत हंगामातील जवळपास ३०० कोटी रूपयाहून अधिक रूपयांची एफआरपी थकविली… Continue reading ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करा : राजू शेट्टी

राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादासो भुसे यांच्याकडे केली. तसेच लॉकडाऊन करायचे असेल तर शेतमालाच्या वितरण व्यवस्थेची व्यवस्था करावी,  शेतमालाचे दर पडणार नाहीत  याची खात्री द्यावी, अशी मागणी मुख्य सचिव… Continue reading राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा : राजू शेट्टी

कोल्हापुरातील ‘डी मार्ट’ला महापालिकेचा दणका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  महापालिकेच्या वतीने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाईचा धडका सुरू केला आहे. त्यानुसार रंकाळा चौपाटीवरील खाऊचे स्टॉल आणि रंकाळ्याजवळील ‘डी मार्ट’ येथे तपासणी करण्यात आली. यावेळी येथे कोरोना नियमांचा भंग करण्यात आल्याचे निदर्शनास आले असता महापालिकेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली.           डी मार्टमध्ये सोशल डिस्टंन्सचे पालन होत… Continue reading कोल्हापुरातील ‘डी मार्ट’ला महापालिकेचा दणका

पंढरपूर पोटनिवडणूक : जयंत पाटलांच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  राष्ट्रवादी आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. या दोन पक्षांमध्येच अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, प्रचाराला वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक दावा करून भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी परिचारक,… Continue reading पंढरपूर पोटनिवडणूक : जयंत पाटलांच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

आळते येथे तुकाराम महाराज बीजसोहळा उत्साहात

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील क॥ आळते येथील श्री हनुमान मंदिरात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा भक्तिमय वातावरणात आज (मंगळवार) पार पडला. तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. तुकाराम महाराजांच्या अभंगात भजनी मंडळ तल्लीन झाले होते. शुद्ध बीजापासून उगम पावलेले, त्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान लाभले व हे काव्य मराठी… Continue reading आळते येथे तुकाराम महाराज बीजसोहळा उत्साहात

इंगळी येथील लाच घेणाऱ्या तलाठ्याला पाठलाग करून पकडले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वीट भट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरीता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी ३० हजार लाचेची मागणी करून २५ हजाराची लाच स्वीकारताना इंगळी (ता. हातकणंगले) येथील तलाठी याला पाठलाग करून रंगेहाथ अटक केली. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (मंगळवार) इचलकरंजी येथे केली. संतोष सुभाष उपाध्ये ( रा. केडीसीसी बँकेसमोर, कुरूंदवाड) असे अटक केलेल्या तलाठ्याचे… Continue reading इंगळी येथील लाच घेणाऱ्या तलाठ्याला पाठलाग करून पकडले

भीमा कारखान्याला शासनाने २० कोटींची मदत केली, हे महाडिकांनी विसरू नये ! : ना. बाळासाहेब पाटील

सोलापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन भीमा सहकारी साखर कारखान्याला २० कोटींची मदत केली, हे धनंजय महाडिक यांनी विसरू नये. शेतकऱ्यांना एफआरपी दिली नसल्याने भीमा कारखान्यावर कारवाई झाली आहे. शासनाच्या मदतीची जाणीव न ठेवता धनंजय महाडिक हे राजकीय आकसापोटी चुकीचे बोलत आहेत, असा पलटवार राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी… Continue reading भीमा कारखान्याला शासनाने २० कोटींची मदत केली, हे महाडिकांनी विसरू नये ! : ना. बाळासाहेब पाटील

यड्राव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात…

यड्राव (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज (मंगळवार) कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यड्राव ग्रामपंचायतिने या संबंधीचा प्रस्ताव तालुका आरोग्याधिकारी दातार यांच्याकडे दिला होता. त्यांच्या प्रस्तावास जिल्हा आरोग्याधिकारी साळे  यांनी मान्यता दिली. या आरोग्य केंद्रावर मंगळवार ते शुक्रवारपर्यंत लसीकरण असणार आहे. या लसीकरणाचे उदघाटन जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, माजी ग्रा.… Continue reading यड्राव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात…

error: Content is protected !!