कोल्हापुरात शेतकरी संघटनेचे ‘करवीर तहसील’विरोधात आंदोलन : आंदोलक – पोलिसांमध्ये झटापट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिये येथील गायरानातील गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून शासकीय जागेवर अतिक्रमण सुरू आहे. मात्र तहसीलदारांसह महसूल प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. या वेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी… Continue reading कोल्हापुरात शेतकरी संघटनेचे ‘करवीर तहसील’विरोधात आंदोलन : आंदोलक – पोलिसांमध्ये झटापट

सत्तेत आल्यावर दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये वाढ देऊ : नवीद मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम्ही सत्तेत आल्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी प्रतिलिटर दोन ते चार रुपये दरवाढ देऊ.  वासाचे दूध निघाल्यानंतर संबंधित संस्थांना योग्य तो मोबदला देऊ, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांनी दिले. आज (मंगळवार) गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर करवीर प्रांत कार्यालयात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी ते बोलत… Continue reading सत्तेत आल्यावर दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये वाढ देऊ : नवीद मुश्रीफ

‘गोकुळ’साठी महादेवराव महाडिक यांच्या थेट ‘जोडण्या’..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केलीय. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज (मंगळवार) सकाळी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांच्या इचलकरंजी येथील निवासस्थानी भेट घेतली. यामुळे महाडिक जरी शांत असले, तरी त्यांचे काम थेट सुरु असल्याचे यातून दिसून येत आहे. गोकुळ निवडणुकीसाठी दोन्हीकडील… Continue reading ‘गोकुळ’साठी महादेवराव महाडिक यांच्या थेट ‘जोडण्या’..!

‘गोकुळ’साठी इच्छुकांची झुंबड ; कार्यकर्ते आणि पोलिसांची धक्काबुक्की (व्हिडिओ)

गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांची धक्काबुक्कीही झालीय..

गोकुळ निवडणूक : अर्ज भरताना कार्यकर्ते -पोलिसांमध्ये धक्काबुक्की

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. करवीर प्रांत कार्यालयात अर्ज भरण्यास आज (मंगळवारी) कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आणि उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. अर्ज भरताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार दिसून आले. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक… Continue reading गोकुळ निवडणूक : अर्ज भरताना कार्यकर्ते -पोलिसांमध्ये धक्काबुक्की

सचिन वाझेंनी कोणता खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलंय ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सचिन वाझे यांने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है, असे ट्विट दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी केले आहे.… Continue reading सचिन वाझेंनी कोणता खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलंय ?

बकबक करणाऱ्या संजय राऊतांची आधी चौकशी करा : काँग्रेस नेता

मुंबई (प्रतिनिधी) : सचिन वाझे प्रकरणावरून बकबक करणारे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची आधी चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. याबाबत निरूपम यांनी ट्विट केले आहे. संजय राऊत यांनी पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचे म्हटले होते. आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे एनआयएने आता… Continue reading बकबक करणाऱ्या संजय राऊतांची आधी चौकशी करा : काँग्रेस नेता

शरद पवार, अमित शहांच्या भेटीवर काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबादमधील भेटीच्या वृत्तानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आता यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा… Continue reading शरद पवार, अमित शहांच्या भेटीवर काँग्रेसची प्रतिक्रिया

लॉकडाउनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाउन हा विषय कोणालाच मान्य नाही,  आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते, तेव्हा ऐनवेळी लॉकडाउन करत नसतो. तो अभ्यास करण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,  असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.   मंत्री टोपे म्हणाले की, लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय… Continue reading लॉकडाउनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

मुंबई  (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे आज (मंगळवारी)  पहाटे रूग्णालयात  उपचार सुरू असताना निधन झाले.  त्यांना हृदयविकाराचा  झटका आला. करड्या शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यांचे शिक्षण एमएससीपर्यंत झाले होते.  रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर… Continue reading मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

error: Content is protected !!