शेणवडे गावच्या भाजप कार्यकर्त्यांचा ना. सतेज पाटील गटात प्रवेश…

साळवण (प्रतिनिधी) :  गनबावडा तालुक्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असे चार पक्ष कार्यरत आहेत. त्यापैकी २७ सप्टेंबर रोजी इतर पक्षातील कार्यकर्ते सतेज पाटील यांच्या गटात सामिल झाले होत  जिल्हा बँकेसाठी ना. सतेज पाटील यांना ठरावही दिले होते. त्यातच गगनबावडा तालुक्यातील शेणवडे गावातील २५ ते ३० वर्षे काँग्रेसच्या विरोधात असणारा गट आज (रविवार) काँग्रेस पक्षात… Continue reading शेणवडे गावच्या भाजप कार्यकर्त्यांचा ना. सतेज पाटील गटात प्रवेश…

सातवेच्या कुस्ती मैदानात पै. रागु ठोंबरेची बाजी…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे श्री आळोबानाथ जागरानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम  क्रमांकाच्या कुस्तीत पै. रागु ठोंबरे (शाहुपुरी तालीम, कोल्हापूर) याने एकच्याक डावावर गंगावेश तालमीच्या पै. सतपाल नागटिळक याला आस्मान दाखवले. यावेळी कुस्ती आखाड्याचे पूजन विश्वेश कोरे, ज्योतिरादित्य कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.    तर द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत संतोष जाधव… Continue reading सातवेच्या कुस्ती मैदानात पै. रागु ठोंबरेची बाजी…

करंबळी येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी येथे एका विवाहितेचे स्नान करताना चोरुन मोबाईलवर चित्रीकरण करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पवन हरिबा जाधव (रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. ही घटना (दि. १४) रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हा संबधित विवाहितेच्या घराशेजारी रहायला आहे. गुरुवारी ती विवाहिता… Continue reading करंबळी येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा…

आंबेवाडी, प्रयाग चिखलीतील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे सर्वेक्षण करा : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि प्रयाग चिखली गावातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात २० ऑक्टोबर रोजी सर्वेक्षण करून स्थळ पाहणी करून पुढील कार्यवाही करावी. असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांनी आंबेवाडी आणि प्रयाग चिखली ग्रामस्थांशी पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. पंचगंगा नदीकाठावर असलेल्या प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावांना १९८९,… Continue reading आंबेवाडी, प्रयाग चिखलीतील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे सर्वेक्षण करा : पालकमंत्री

शहरातील बिगरशेती मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड देणार : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येत्या दोन महिन्यात कोल्हापूर शहरातील बंद झालेल्या बिगरशेती सातबाराचे प्रॉपर्टी कार्ड मिळकत धारकांना द्यावे. असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिले. माजी नगरसेवक मधुकर रामाने यांच्या शिष्टमंडळाने याबाबत आज पालकमंत्री आ. ऋतुराज पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार हे आदेश पालकमंत्र्यंनी दिले आहेत. कोल्हापूर शहरातील बिगरशेती प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड करण्याचे काम… Continue reading शहरातील बिगरशेती मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड देणार : पालकमंत्री

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : शरद पवार

पिंपरी (प्रतिनिधी) : सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.   शरद पवार म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून काहीच साध्य होणार नाही.  राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला पाच… Continue reading केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : शरद पवार

शेतकरी संघटनेतर्फे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार 

कागल (प्रतिनिधी) : यंदाच्या गळीत हंगामासाठी देशात सर्वप्रथम एफआरपी  एकरकमी देण्याची घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केली. या निर्णयाबद्दल शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी संघटनेच्या वतीने घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर करवीर तालुका पूर्वभाग पत्रकार संघाच्या वतीनेही घाटगे यांचा सत्कार केला. गळीत हंगाम २०२१- २२ च्या तोंडावर एफआरपीची रक्कम २ टप्प्यात… Continue reading शेतकरी संघटनेतर्फे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार 

जिल्ह्यात चोवीस तासात सर्वच तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा निरंक…  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मृत्यूचा आकडा निरंक आहे. तर ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३, आजरा – ०, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – ०, गगनबावडा – ०, हातकणंगले – ०, कागल – ०,  करवीर… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात सर्वच तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा निरंक…  

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल, तर बाकीच्या देशांनी… : मायकेल वॉन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. टी-२० विश्वचषकानंतर द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वृत्ताला बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. टी-२० विश्वचषकानंतर भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आता भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असेल.… Continue reading राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल, तर बाकीच्या देशांनी… : मायकेल वॉन

‘हिल रायडर्स फौंडेशन’तर्फे जुना राजवाडा कमानीस तांब्याचे तोरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनच्या वतीने विजया दशमी दसऱ्यानिमित जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे तोरण बांधण्यात आले. तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्याची गेल्या ३२ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. प्रारंभी मंगल कलशाचे पूजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक,… Continue reading ‘हिल रायडर्स फौंडेशन’तर्फे जुना राजवाडा कमानीस तांब्याचे तोरण

error: Content is protected !!