राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, गारपिटीचा इशारा

नागपूर  (प्रतिनिधी) : राज्यात थंडीमुळे जनजीवन गारठले असताना पुढील  दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २८ आणि २९ डिसेंबररोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट… Continue reading राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, गारपिटीचा इशारा

उद्धव ठाकरे आजारी असल्याने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २- ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे देण्यात यावे, असे  रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी  म्हटले आहे. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. राज्याचा कारभार मुख्यमंत्र्यांविना  चालल्याची टीका भाजपने केली जात  आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… Continue reading उद्धव ठाकरे आजारी असल्याने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा

रोहीत परीट यांना गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार साजणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसेच रोहीत परीट यांना देण्यात आला. तंत्र स्नेही, विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक, उपक्रमशील शिक्षक अशी परीट यांची ओळख आहे. यावेळी ह.भ.प.मा.शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, रमेश आव्हाड, बबनराव रसाळ, डॉ. शुभदा जोशी, मनुष्यबळ विकास… Continue reading रोहीत परीट यांना गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान…

सोशल कनेक्टतर्फे वेसरफ धनगरवाडा येथे २० मुलींना सायकल वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोशल कनेक्टतर्फे गगनबावडा तालुक्यातील  वेसरफ धनगरवाडा येथे २० मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल  रेखावार,  डॉ. संदीप पाटील, प्राचार्य डॉ.महादेव नरके, तहसिलदार संगमेश कोडे, डॉ. समीर कोतवाल, निखिल विभुते, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सहदेव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी… Continue reading सोशल कनेक्टतर्फे वेसरफ धनगरवाडा येथे २० मुलींना सायकल वाटप…

नितेश राणेंच्या अटकेनंतर पुन्हा शिवसेना-राणे संघर्ष चिघळणार ?     

सिंधुदुर्ग  (प्रतिनिधी) : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ल्याप्रकरणी  भाजप आमदार नितेश राणे यांची पोलिसांनी चौकशी  केली होती. आता त्यांच्या अटकेची मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.   कणकवलीमध्ये  झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण हे पोलिसांनी जाहीर करावे.… Continue reading नितेश राणेंच्या अटकेनंतर पुन्हा शिवसेना-राणे संघर्ष चिघळणार ?     

खून प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार : पोलीस आयुक्त जखमी  

पिंपरी (प्रतिनिधी) : खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर  चाकण परिसरातील कोये येथे गोळीबार झाला. यात कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाले. अर्धा तासाच्या चकमकीनंतर पोलिसांनी आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांना अटक केली.   पिंपरी-चिंचवडमध्ये गोळ्या झाडून योगेश जगताप या तरुणाचा खून करण्यात आला… Continue reading खून प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार : पोलीस आयुक्त जखमी  

पुणे- बंगळुरू महामार्गावरील अपघातात सांगलीतील महिला ठार

टोप (प्रतिनिधी) :  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर महाडिक बंगल्याशेजारी मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात सांगली जिल्ह्य़ातील महिला ठार तर पती, मुलगा, मुलगी गंभीर जखमी झाले.  त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत महिला भाग्यश्री हनुमंत कुंभार (  वय  २९) तर पती हनुमंत विठ्ठल कुंभार  ( वय  ३८ )  मुलगा स्वराज्य (वय ६) तर  मुलगी शिवन्या (वय ३… Continue reading पुणे- बंगळुरू महामार्गावरील अपघातात सांगलीतील महिला ठार

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत : विधीमंडळात ठराव

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ओबीसी  समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत.  याबाबत  निवडणूक आयोगाला  माहिती देण्यात यावी, असा ठराव विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी एकमताने विधीमंडळात मंजूर केला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसींच्या आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल… Continue reading ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत : विधीमंडळात ठराव

पडसाळी येथे तलावात बुडून दोघांचा मृत्यू…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथील लघुपाटबंधारे तलावात नातेवाईकांसह रविवारची सुट्टीमध्ये सैर करायला आलेले दोघेजण पोहताना बुडाले आहेत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने लहान  मुलासह एका तरूणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. ओम महेश गांजवे (वय १३, रा. रंकाळा टॉवर, कोल्हापूर) आणि ऋषीकेश नंदकुमार होगाडे (वय २७, रा. इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज (रविवार) दुपारी… Continue reading पडसाळी येथे तलावात बुडून दोघांचा मृत्यू…

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघावित : किशोर जाधव

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी खेळ मनोरंजन आणि अंगभूत कलेला वाव देताना अभ्यासाला महत्त्व द्यावे. परिस्थितीचा कधी विचार न करता संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते. त्यामुळे मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे भूमी अभिलेख अधीक्षक किशोर जाधव यांनी केले. ते  लेफ्टनंट जनरल एसपी थोरात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी… Continue reading विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघावित : किशोर जाधव

error: Content is protected !!