नाट्यसंस्थांना भोसले नाट्यगृहाच्या भाड्यात मोठी सवलत : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील स्थानिक नाट्यकर्मी आणि नाट्यसंस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी ३१ मार्चपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहातील भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. सांस्कृतिक वसा जपण्यासाठी या पुढील काळात स्थानिक नाट्यकर्मींना कायमस्वरूपी कमी दरात केशवराव नाट्यगृह उपलब्ध होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.   केशवराव भोसले… Continue reading नाट्यसंस्थांना भोसले नाट्यगृहाच्या भाड्यात मोठी सवलत : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज माघारसाठी ‘शिरोळ’ तहसीलमध्ये गर्दी (व्हिडिओ)

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुकामध्ये ३३ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहेत. अर्ज माघार घेण्याची आज (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने शिरोळ तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील उमेदवारांसोबतच कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तालुक्यातील निवडणूक ही अत्यंत अतितटीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. तर शिरटी सारख्या गावामध्ये १३ जागेसाठी २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.  

यड्राव ग्रामपंचायत निवडणूक : ४७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.  यड्राव ग्रामपंचायतीमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. गावातील ६ प्रभागासाठी ९४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४७ उमेदवारांनी आज (सोमवार) माघार घेतली आहे. ४७ पैकी १३ उमेदवार अपक्ष आहेत. या गावामध्ये सत्ताधारी पॅनल व विरोधी पॅनलमध्ये चुरशीची लढत या गावांमध्ये होणार… Continue reading यड्राव ग्रामपंचायत निवडणूक : ४७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

गडहिंग्लज येथे शुक्रवारी ना. हसन मुश्रीफ यांचा सत्कार…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  शासनाच्या विविध विकास कामांच्या योजनामधून ११ कोटी ५४ लाख रुपये, गडहिंग्लज शहराची वाढीव हद्द, शहरातील विविध विकास कामे ना.हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले. त्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. ना.मुश्रीफ यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता गडहिंग्लज शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे शुक्रवार (दि. ८) रोजी सायंकाळी ६ वाजता गडहिंग्लज नगरपरिषद येथे… Continue reading गडहिंग्लज येथे शुक्रवारी ना. हसन मुश्रीफ यांचा सत्कार…

हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

हातकणंगले (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सुमारे सव्वाचारशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक  बिनविरोध झाली आहे. यासाठी  माजी आमदार अमल महाडिक व आ. विनय कोरे यांचे सहकार्य लाभले. ९ पैकी ७ जागा महाडिक गटाचे शिवाजीराव पाटील (काका) यांच्या गटाला तर कोरे गटाचे संपतराव पाटील यांच्या गटाला २ अशी विभागणी करून ही… Continue reading हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत ६ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात ६ जणांना लागण झाली आहे. तर ११३६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर २,  करवीर तालुक्यातील ४ अशा ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,५६९, डिस्चार्ज – ४७, ८१०, उपचारासाठी दाखल रुग्ण – ५०, मृत्यू… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत ६ जणांना लागण

‘ते’ भाजपमध्येच राहावेत, अशी आमची अपेक्षा : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

केशवराव भोसले नाट्यगृहात नाट्यकर्मी आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यानंतर ना. सतेज पाटील यांनी विविध विषयांवर मते व्यक्त करताना भाजपमधील ‘त्या’ नेत्यांना टोला लगावला.  

रविकिरण इंगवले म्हणतात, ‘जिल्ह्यातील ‘हा’ नेता लई भारी..! (व्हिडिओ)

शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी विविध विषयांवर मते व्यक्त करताना जिल्ह्यातील ‘हा’ प्रमुख नेता आपल्याला आवडतो आणि त्यांचा मी आदर करतो, असे विधान केले आहे.  

गडहिंग्लज बसस्थानक परिसरात एटीएम सेंटर सुरू करण्याची मागणी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे मोठी बाजारपेठ आहे. चंदगड, आजरा, भुदरगड व सीमाभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात दवाखाना, शैक्षणिक कामासाठी तसेच विविध वस्तू खरेदीच्या निमित्ताने इथे येत असतात. परंतु बसस्थानक परिसरात कोठेही एटीएम सेंटरची सोय नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होते. एटीएम शोधण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागते. त्यामुळे येथील गडहिंग्लज आगार व्यवस्थापकांनी कोणत्याही बँकेशी चर्चा करून बसस्थानक… Continue reading गडहिंग्लज बसस्थानक परिसरात एटीएम सेंटर सुरू करण्याची मागणी

महापालिका निवडणूक : भाजपतर्फे समितीची घोषणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने माजी खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांच्या निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी (गुरुवारी) धनंजय महाडिक व महेश जाधव यांची समिती स्थापन करून योग्य नियोजन करण्यासाठी त्यांच्या… Continue reading महापालिका निवडणूक : भाजपतर्फे समितीची घोषणा

error: Content is protected !!