गिरीश महाजन अडचणीत : पुण्यात गुन्हा दाखल   

जळगांव (प्रतिनिधी) : पाच लाखांच्या खंडणी प्रकरणी भाजपचे नेते आणि आमदार गिरीष महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील कोथरुढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठी विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांचे अपहरण करुन त्यांना चाकूचा धाक दाखवून राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप आहे. संस्थेच्या वादात भोईट… Continue reading गिरीश महाजन अडचणीत : पुण्यात गुन्हा दाखल   

संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने नव्या इमारतीच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने ‘सेंट्रल विस्ता ड्रीम प्रोजेक्ट’चा मार्ग मोकळा झाला आहे. इमारतीचे बांधकाम सुरु करण्याआधी वारसा संरक्षण समितीच्या संमतीची गरज आहे. याशिवाय पर्यावरण समितीने केलेल्या शिफारसी योग्य असून पर्यावरण मंत्रालयाने… Continue reading संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा  

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत बाळासाहेब थोरातांचा खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) : पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, जर तरुणांना संधी मिळणार असेल, तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीवारीनंतर पत्रकारांशी बोलताना… Continue reading काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत बाळासाहेब थोरातांचा खुलासा

औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची सातत्याने कोंडी करणाऱ्या भाजपला शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई  यांनी चांगलेच फटकारले आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेला टोमणे मारते. चंद्रकांत पाटील यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी इतकीच बांधिलकी होती. तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का, असा खरमरीत सवाल सुभाष देसाई… Continue reading औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

ग्रा.पं.निवडणूक : यड्रावमध्ये दुरंगी लढत   

इचलकरंजी (प्रतिनिधी) : : शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांचे गाव असलेल्या यड्राव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. सोमवारी अर्ज माघारीनंतर यड्रावमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध यड्रावकर गट, सतेंद्रराजे गट, शिवसेना आणि शेतकरी संघटना अशी लढत होणार आहे. शेतकरी संघटनेने बिनशर्त… Continue reading ग्रा.पं.निवडणूक : यड्रावमध्ये दुरंगी लढत   

यड्रावमध्ये अपक्ष उमेदवारांनी फोडला प्रचाराचा नारळ..! (व्हिडिओ)

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता.शिरोळ)  ग्रामपंचायत  निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांनी आज (मंगळवार) ग्रामदैवताला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. प्रभाग क्रमांक ४  मधील उमेदवार  नितीन बिरंजे,  प्रभाग क्रमांक ३ चे औरंग शेख यांनी ग्रामदैवत व सर्व मंदीरमध्ये श्रीफळ वाढवून आशीर्वाद घेतला.    सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आरोग्य  राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या यड्राव गावामध्ये एकूणच भाजप… Continue reading यड्रावमध्ये अपक्ष उमेदवारांनी फोडला प्रचाराचा नारळ..! (व्हिडिओ)

आंबर्डे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध..!

कळे  (प्रतिनिधी)  :  पन्हाळा तालुक्यातील पश्चिम विभागामधील आंबर्डे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील  ही सर्वात पहिली बिनविरोध ग्रामपंचायत ठरल्याने कौतुक  केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील  अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून त्यापैकी ४७ गावामध्ये  निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे. पन्हाळा तालुक्यात आंबर्डे गावातील नागरिकांनी एकत्र येत तालुक्यात पहिली बिनविरोध ग्रामपंचायत करण्यात बाजी मारली.… Continue reading आंबर्डे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध..!

‘ईडी’ची नोटीस : रोहित पवारांनी व्यक्त केली भीती

मुंबई (प्रतिनिधी) : ‘ईडी’च्या नोटीस भाजपच्या लोकांना नाही, तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. त्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने सुरू आहे. सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उद्या कदाचित मलाही ईडीची नोटीस येईल,… Continue reading ‘ईडी’ची नोटीस : रोहित पवारांनी व्यक्त केली भीती

आजरा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध…

आजरा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. आजरा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामध्ये होनेवाडी, गवसे, खोराटवाडी, एंरडोळ, पेद्रेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आजरा तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये देवर्डे, सुळे, सिरसंगी, बेलवाडी, चिमणे, किणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. महागोंड, मुमेवाडी, चव्हाणवाडी, जाधेवाडी, हालेवाडी, देवकांडगाव, हाळोली, दर्डेवाडी, मेढेवाडी,… Continue reading आजरा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध…

तेरा हजारांची लाच घेताना शिपायाला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका महिलेच्या नावे विद्युत ठेकेदारीचा परवाना मुंबई येथील कार्यालयातून मिळवून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या  शिपायाला अटक करण्यात आली. अरविंद मधुकर लबदे (वय ४३, रा. माने कॉलनी, तामगाव, ता. करवीर) असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) सायंकाळी ही कारवाई भवानी मंडप येथील पागा बिल्डिंगमध्ये विद्युत निरीक्षक… Continue reading तेरा हजारांची लाच घेताना शिपायाला अटक…

error: Content is protected !!