तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

सिडनी (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाविरूद्धची दुसरी कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत मराठ मोळा अजिंक्य राहणे भारताचे नेतृत्व करणार आहे. तर पुनरागमन केलेला आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या खांद्यावर उपकर्णधाराची धुरा देण्यात आली आहे. सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची आज (बुधवार) घोषणा करण्यात आली.  या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज… Continue reading तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

कोल्हापूरच्या अनुजा नेटके यांना परतूरच्या संस्थेचा ‘लुई ब्रेल पुरस्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील परतूर येथील लुई ब्रेल शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी व्यक्ती किंवा संस्थेला लुई ब्रेल पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा हा पुरस्कार कोल्हापुरातील ‘दिव्यदृष्टीच्या’ अनुजा नेटके यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष शंकरराव राखुंडे यांनी केली. राखुंडे यांनी सांगितले की, दरवर्षी चार जानेवारीला अंधांसाठी ‘ब्रेल लिपी’ विकसित करणाऱ्या लुई ब्रेल यांची जयंती… Continue reading कोल्हापूरच्या अनुजा नेटके यांना परतूरच्या संस्थेचा ‘लुई ब्रेल पुरस्कार…

आता शहरातील बेवारस वाहने होणार टॅप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाहतुकीस अडथळा होतो, अशा शहरातील बेवारस वाहने पोलीस प्रशासनाकडून टॅप करण्यात येणार आहे. तरी अशा वाहनांची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेस ९९२३७९९७०९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावी, असे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने केले आहे. शहरात वाहतुकीस अडथळा होवून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागू नये. यासाठी शहरातील दक्ष नागरिकांनी या ॲपव्दारे बेवारस वाहनांची… Continue reading आता शहरातील बेवारस वाहने होणार टॅप

‘मंत्रालय आपल्या दारी’ मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातून ! : उदय सामंत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वच विभागीय सहसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ‘मंत्रालय आपल्या दारी’ अभियानाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून करावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना केली आहे.  कोल्हापूर येथील उच्च शिक्षण विभागांतर्गत विभागीय सहसंचालक कार्यालयामध्ये सुरू असलेल्या कामकाजाची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या… Continue reading ‘मंत्रालय आपल्या दारी’ मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातून ! : उदय सामंत

औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय..? : शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापले असताना शिवसेनेने पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. त्यास काँग्रेसने मोठा विरोध केला आहे. तर या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय?,… Continue reading औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय..? : शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

राज्यात थंडीचा कडाका वाढणार

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर भारतात तुफान पाऊस आणि गारा पडत असताना आता महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत मुंबईसह कोकणात रिमझिम पाऊस तर चार जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात गारठा वाढल्याचेही जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार… Continue reading राज्यात थंडीचा कडाका वाढणार

…त्यामुळे साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले (व्हिडिओ)

सांगली (प्रतिनिधी) : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफआरपी न दिल्याच्या निषेधार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव (ता.पलूस) येथील कार्यालय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. हा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा घडला. आगीत कार्यालयातील कागदपत्रे व फर्निचर जळाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्याने… Continue reading …त्यामुळे साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले (व्हिडिओ)

आ. पी.एन.पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने   

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीने झालेले नुकसान व समाजातील सर्वच स्‍तरावर झालेला त्‍याचा आर्थिक परिणाम तसेच नवीन येवू घातलेली कोरोनाची साथ, या पार्श्‍वभूमीवर कर‍वीरचे आमदार पी.एन. पाटील यांनी आपला आज (बुधवार) होणार वाढदिवस अत्‍यंत साधेपणाने करण्‍याचा निर्णय घेतला. राजारामपुरीत त्‍यांच्‍या निवासस्‍थानी गोकुळ परिवारातर्फे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी भेट देऊन त्‍यांना वाढदिवसाच्‍या… Continue reading आ. पी.एन.पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने   

राज्यात ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग..? : पशुसंवर्धन विभागाचा मोठा खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) : हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यांमधील स्थलांतरीत पक्षांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला आहे. परंतु महाराष्ट्रात वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोंबडयांमध्ये या रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही. किंवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.… Continue reading राज्यात ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग..? : पशुसंवर्धन विभागाचा मोठा खुलासा

मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई (प्रतिनिधी) : अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांकडे दिली आहे. याप्रकऱणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने २१ डिसेंबरला महापालिकेच्या मुख्यालयात आपले खासगी सचिव यांना फोन केला. आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आपल्याला जीवे… Continue reading मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

error: Content is protected !!