रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर कोकणातील त्यांचे शिलेदार वैभव खेडेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी मौन सोडले आहे. त्यांनी थेटच वैभव खेडेकर यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले, मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर आधीच चार ते पाच गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर आणखी पाच गुन्हे दाखल होऊ शकतात, या सगळ्याच्या  फाईल माझ्याकडे आहेत. या फाईलच पत्रकार परिषदेत दाखवत “केवळ आणि केवळ मला राज साहेबांनी फोन केला, की रामदासभाई थांबा, वैभव आपलाच आहे, म्हणून मी थांबलो आहे” अशा शब्दात रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांच्यावर टीका करत आपली नाराजी व्यक्त केली.

पुढे बोलताना कदम म्हणाले,”वैभव खेडेकर यांनी 2019 साली माझ्या मुलाच्या विरोधात राष्ट्रवादीकडून काम केले.मनसेची  राष्ट्रवादी सोबत कोणत्याही ठिकाणी युती नसताना गेल्या पाच वर्षात माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेणं,चालू होत. राज ठाकरे आणि अनिल परब यांची तर युती नाही, पण तरीही वैभव खेडेकर, अनिल परब, संजय कदम हे अनेक वेळा एकत्र असतात. याचा उद्देश फक्त राजकीय दृष्ट्या मला आणि माझ्या मुलाला संपवणे हा आहे. माझ्या मुळावर जर कोणी उठला तर मी त्याला सोडेन का?” असा सवालही रामदास कदम यांनी केला.राज ठाकरेंकडे वैभव खेडेकरला घेऊन जाणारही मी होतो.आजपर्यंतच्या खेडच्या इतिहासातला सगळ्यात भ्रष्टाचारी नगराध्यक्ष कोणी असेल तर तो वैभव खेडेकर आहे ,असा गंभीर आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.