कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या नव्याने गठीत करावयाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर प्रवर्ग निहाय अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी इच्छुकांनी दि. ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जिल्हा परिषद सदस्य- दोन, महापालिका, नगरपालिका सदस्य- दोन, पंचायत समिती सदस्य-दोन, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी-दोन, ग्राहक संघटना प्रतिनिधी- दहा, शाळा, महाविद्यालय प्रतिनिधी-दोन, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी- दोन, व्यापार व उद्योग क्षेत्र- दोन, पेट्रोल व गॅस विक्रेते प्रतिनिधी- दोन व शेतकरी प्रतिनिधी- दोन याप्रमाणे नियुक्ती करण्यात येणार आहे.

अशासकीय सदस्यांच्या निवडीचे निकष व अनुषंगिक माहिती, अर्जाचा नमुना (परिशिष्ट-अ) आणि सादर करावयाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे (परिशिष्ट-ब) जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे संकेतस्थळ kolhapur.gov.in वर उपलब्ध आहे. अर्ज पोस्टाव्दारे अथवा समक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील, असेही जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.