कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवात श्री अंबाबाईच्या पूजा दशमहाविद्या पैकी ७ स्वरूपात बांधण्यात येणार असल्याची माहिती श्री पूजक मंडळातर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
देवी महात्म्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासनेमध्ये काली, तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी । भैरवी छिन्नमस्ता च विद्या धूमावती तथा ।। बगला सिद्धविद्याच मातंगी कमलात्मिका । एता दशमहाविद्याः सिध्द्धविद्याः प्रकीर्तिताः|| या दशमहाविद्या म्हणजेच देवीच्या दहा स्वरूपांची उपासना अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. महा सती गौरीच्या क्रोधातून उत्पन्न झालेल्या तिच्या दहा रूपांना दशमहाविद्या असे नाव आहे. यातील प्रत्येक देवीचे स्वरूप वेगळे असून त्याच्या उपासनेचे फलही वेगळे आहे. देवी महात्म्यात वर्णन केलेल्या या रूपांची महती आणि माहिती देवी भक्तांना समजावी यासाठी या पूजा बांधण्यात येणार आहेत.
सोमवार दि. २२ : श्री कमलादेवी
मंगळावर दि. २३ : श्री बगलामुखी
बुधवार दि. २४ : श्री तारा
गुरुवार दि. २५ : श्री मातंगी
शुक्रवार दि.२६ : श्री भुवनेश्वरी
शनिवार दि.२७ : अंबारीतील पूजा
रविवार दि.२८ : श्री षोडशी त्रिपुरसुंदरी
सोमवार दि.२९ : श्री महाकाली
मंगळवार दि.३० : श्री महिषासुरमर्दिनी
बुधवार दि. १ : श्री भैरवी
गुरुवार दि. २ : रथारुढ पूजा