पन्हाळा (प्रतिनिधी) : देशासह राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) पन्हाळ्यावर कोल्हापूर हायकर्स आणि नगरपरिषदेच्या वतीने ३७५ फूट लांब तिरंगाची रॅली काढण्यात आली. ही रॅली बाजीप्रभू पुतळा ते छत्रपती शिवमंदिरपर्यंत घोषणा देत पार पडली.

यावेळी अभिनेत्री सोनाली पाटील, कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील, उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार विनय कौवलवकर यांच्यासह गडावरील नागरिक शिवभक्त उपस्थित होते.