महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील हुपरी, कणेरीवाडी, कागल, गडहिंग्लज यासह संकेश्वर, निपाणी या सीमाभागामध्ये मोटारसायकलवरून येऊन महिलांना लुटणाऱ्या सराईत चोरट्याला राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारच्या सुमारास राजारामपुरी चौदाव्या गल्लीत केली. चोरट्यांकडून १४ मोबाईल, १ मोटारसायकल असा २ लाख ३६ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमित महादेव निकम… Continue reading महिलांना लुटणारा सराईत चोरटा जेरबंद

पहिली ते आठवीची यंदाची वार्षिक परीक्षा रद्द : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : मागच्या वर्षापासून आपण सर्व जण कोरोनाला तोंड देत आहोत. त्याचा शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. वाढता धोका पाहता १ ली ते ४ ची शाळा सुरू करता आली नाही. ५ वी ते ८ वीच्या शाळा कशाबशा सुरु करण्यात आल्या. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत अभ्यासक्रम पूर्ण… Continue reading पहिली ते आठवीची यंदाची वार्षिक परीक्षा रद्द : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मलबार हिलमध्ये तब्बल १ हजार कोटीला खरेदी केलं घर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील  उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये घर खरेदीचा विक्रमी व्यवहार  झाला आहे. हा व्यवहार बांधकाम क्षेत्रात  चर्चेचा विषय ठरला आहे. मलबार हिलमध्ये तब्बल १ हजार कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे.  हे घर डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी विकत घेतले आहे. राधाकृष्ण दमानी यांनी ३१ मार्चला… Continue reading मलबार हिलमध्ये तब्बल १ हजार कोटीला खरेदी केलं घर

कोल्हापुरी ठसका : ‘गोकुळ’वर उड्या का पडतात ?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजेच ‘गोकुळ’ च्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. गोकुळ म्हणजे जिल्ह्याची डेअरी असली तरी तिची ठळक ओळख म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची मुख्य वाहिनी. ‘गोकुळ’ च्या स्थापनेपूर्वी ती एक शासकीय डेअरी होती. लालफितीचा कारभार आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे ती फारशी चालत नव्हती. वसंत-बहार चित्रमंदिराच्या परिसरात ही डेअरी होती. अपेक्षेप्रमाणे डबघाईला… Continue reading कोल्हापुरी ठसका : ‘गोकुळ’वर उड्या का पडतात ?

महापालिकेच्या ‘अतितत्परते’मुळे शिवाजी पेठेतील व्यक्तीचा जीव टांगणीला..?

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यातच संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीच्या छायेखाली सर्वसामान्य वावरत असताना शिवाजी पेठेत एक धक्कादायक प्रकार घडला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. महापालिकेच्या विचित्र कारभारचा अनेकांना फटका बसला आहे. परंतु आता महापालिका आरोग्य विभागाची अतितत्परता एका व्यक्तीच्या जीवावर बेतली असती. या प्रकारानंतर महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.            … Continue reading महापालिकेच्या ‘अतितत्परते’मुळे शिवाजी पेठेतील व्यक्तीचा जीव टांगणीला..?

यड्राव येथील उपआरोग्य केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील उपआरोग्य केंद्रातील  कोविड लसीकरण सेंटरला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  आज (शनिवार)  सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लस घेतलेल्या नागरिकांची विचारपूस केली. ४५ वर्षांवरील सर्व  नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी   नागरिकांना केले. कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना जिल्हाधिकारी यांनी उपआरोग्य केंद्राला  भेट दिली. त्यांच्यासोबत शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे… Continue reading यड्राव येथील उपआरोग्य केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

गगनबावडा तालुक्यातून ‘गोकुळ’साठी २ उमेदवारी अर्ज दाखल

साळवण (प्रतिनिधी) :  गगनबावडा तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातून सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी शाहू आघाडीतून जिल्हा मल्हारसेना अध्यक्ष बयाजी शेळके (वेसरफ) व बंडोपंत कोटकर (साखरी) यांनी अर्ज दाखल केला. कोटकर हे त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर… Continue reading गगनबावडा तालुक्यातून ‘गोकुळ’साठी २ उमेदवारी अर्ज दाखल

आजरा तालुक्यातून शिंपी गटाकडून ‘गोकुळ’साठी २ उमेदवारी अर्ज

 आजरा (प्रतिनिधी)  : आजरा तालुक्यातून आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष व जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी गटाकडून त्यांचे पुत्र अभिषेक शिंपी यांनी गोकुळ निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज सर्वसाधारण गटातून तर दुसरा अर्ज नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातून  दाखल केला आहे. तालुक्यातील २३३ ठरावांपैकी आपल्याकडे सर्वाधिक ठराव असल्याचा त्यांनी दावा केला आहे.… Continue reading आजरा तालुक्यातून शिंपी गटाकडून ‘गोकुळ’साठी २ उमेदवारी अर्ज

रायगडावरील उत्खननात आढळली सोन्याची बांगडी

रायगड (प्रतिनिधी) : रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं, अशा वस्तू मिळालेल्या आहेत. जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूस असलेल्या वाड्यात सुरू असलेल्या  उत्खननामध्ये गुरूवारी सोन्याची मौल्यवान बांगडी सापडली. दरम्यान, याआधी उत्खननात तुटलेली सोन्याची साखळी आढळून आली होती. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील… Continue reading रायगडावरील उत्खननात आढळली सोन्याची बांगडी

आमदार आबिटकर यांच्या निर्णयामुळे आघाडी भक्कम : पालकमंत्री सतेज पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय आज गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला. आमदार आबिटकर यांच्या निर्णयाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले होते. आमदार आबिटकर यांच्या निर्णयामुळे राजर्षी शाहू आघाडी भक्कम झाल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. खासदार संजय मंडलिक… Continue reading आमदार आबिटकर यांच्या निर्णयामुळे आघाडी भक्कम : पालकमंत्री सतेज पाटील

error: Content is protected !!