दत्त आसुर्ले-पोर्ले कारखान्याची निवडणूक लवकरच ! : डॉ. एस. एन. जाधव (व्हिडिओ)

जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांबरोबरच दत्त आसुर्ले-पोर्ले कारखान्याची निवडणूक लवकरच होणार असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली.  

मोकाट गायींचे संगोपन करण्यासाठी सोयीसुविधा देऊ : नगराध्यक्षा अलका स्वामी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणची मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर मोकाट गायींचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी स्वीकारणाऱ्या सेवाभावी संस्थांना पुरेशी जागा आणि आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली. इचलकरंजी पालिकेच्या सभागृहात आज (शुक्रवारी) वाहतूक सिग्नल दुरुस्ती,… Continue reading मोकाट गायींचे संगोपन करण्यासाठी सोयीसुविधा देऊ : नगराध्यक्षा अलका स्वामी

कोल्हापूरच्या चिमुकल्या दुर्वांक गावडेचा अनोखा जागतिक विक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा… या संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे अवघ्या ८ वर्षांच्या  दुर्वांक गुरुदत्त गावडे याने अनोखा जागतिक विक्रम केला आहे. कोल्हापुरातील शांतिनिकेतन प्रशालेत तिसरीमध्ये शिकणाऱ्या दुर्वांकने २०० विषाणूंची यादी तयार केली. या विषाणूंची अवघड नावे त्याने अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदामध्ये सांगून विश्वविक्रम केला. या विक्रमाची… Continue reading कोल्हापूरच्या चिमुकल्या दुर्वांक गावडेचा अनोखा जागतिक विक्रम…

सरसंघचालकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्याची मागणी

आजरा (प्रतिनिधी) : सरसंघचालक मोहन भागवत यांना जीवे मारण्याची तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्य कार्यालय उडवून देण्याची जाहीर धमकी देणाऱ्या अरुण बनकर या इसमावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. आज (शुक्रवार) याबाबतचे निवेदन आजरा पोलिसांना देण्यात आले.   आजरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना देण्यात भारतीय जनता युवा… Continue reading सरसंघचालकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्याची मागणी

पुणे-बेंगलोर महामार्गावरील अपघातात उजळाईवाडीची महिला ठार

करवीर (प्रतिनिधी) : अज्ञात भरधाव वाहनाने ॲक्टिवा दुचाकीला ठोकर दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. हा अपघात पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव हद्दीतील शिवनेरी हॉटेलनजीक गुरुवारी रात्री उशिरा झाला. उषा विवेक राणे (वय ३३, रा ब्लॉक नंबर ३२ म्हाडा कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नांव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा राणे गुरूवारी रात्री तावडे… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावरील अपघातात उजळाईवाडीची महिला ठार

…अन्यथा आयुक्त कार्यालयात ॲटम बॉम्ब फोडणार : ‘आप’चा महापालिका प्रशासनाला इशारा  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा घोटाळ्याचे निष्पपातीपणे बाह्य संस्थेकडून ऑडिट करण्यात यावे, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (शुक्रवार) आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर धनगरी ढोल वाजवून जोरदार निदर्शने  करण्यात आली. याबाबतचे निवेदन सह.आयुक्त विनायक औंधकर यांना देऊन येत्या आठ ते दहा दिवसांत विश्वासू बाह्यसंस्थेकडून घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्यात… Continue reading …अन्यथा आयुक्त कार्यालयात ॲटम बॉम्ब फोडणार : ‘आप’चा महापालिका प्रशासनाला इशारा  

…तोपर्यंतच आम्ही खुर्चीवर : अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे सीईओ जोपर्यंत रिटायर होत नाहीत, तोपर्यंत खुर्चीवर बसतात, शिवाय त्यांचे प्रमोशन होत जाते. पण तसे आमचे नसते, जनता सांगेल तोपर्यंत आम्ही खुर्चीवर बसतो. जनता म्हणाली घरी बसा की, आम्ही चाललो, असे सांगून राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय, अडकलोय. कुठे जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असा सल्ला राज्याचे… Continue reading …तोपर्यंतच आम्ही खुर्चीवर : अजित पवार

राज्यातील कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन वाढविला

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेला लॉकडाऊन यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय आज (शुक्रवार) घेण्यात आला.  ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून राज्य सरकारने पुन्हा एकदा २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. याबाबतचे आदेश आज काढण्यात आले असून आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना… Continue reading राज्यातील कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन वाढविला

माणेवाडी येथे खैर लाकडाची वाहतूक करणारे वाहन पकडले

रशिवडे (प्रतिनिधी) : धामोड-कोते- माणेवाडी रस्त्यावरून खैर लाकडाची बिगरपास वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. ही कारवाई कोते पैकी माणेवाडी येथे आज (शुक्रवारी) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. राशिवडे वनरक्षक उमा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी वाहन मालक लहू रामचंद्र माने (रा.कोते पैकी माणेवाडी) आणि लाकूड मालक रामचंद्र साईल (रा.एनारी ता. वैभववाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा… Continue reading माणेवाडी येथे खैर लाकडाची वाहतूक करणारे वाहन पकडले

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी : राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी झालेल्या राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी आहे, असे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाराजी व्यक्त केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (शुक्रवार) सुरूवात झाली. अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषण करताना राष्ट्रपतींनी अनेक विषयांवर भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपती रामनाथ… Continue reading प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी : राष्ट्रपती

error: Content is protected !!