नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबत जाहीर कबुली देणाऱ्या पाकिस्तानाने आपल्या विधानावरुन कोलांडउडी घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत सांगितले होते. आता फवाद यांनी या विधानावरून घुमजाव केले आहे.

फवाद म्हणाले की, २६ फेब्रुवारीला भारताकडून झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल आपण बोललो आहे. पण माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला आहे.

दरम्यान, आम्ही भारतात घुसून मारले. पुलवामामध्ये आपले जे यश आहे ते इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली यश आहे. याचे साथीदार आपण सगळे आहोत आणि माझ्यासह तुम्हीही आहात, असे फवाद यांनी म्हटले होते. आता यावरून त्यांनी घुमजाव करण्याचा प्रयत्न केला आहे.