कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल,महर्षी वाल्मिकी यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आज (शनिवार) साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रा.पं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्या हस्ते फोटोंचे पुजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथही घेण्यात आली.

यावेळी चंदगड पं. स. चे सभापती अनंत कांबळे, पं. स. चंदगडचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे माजी जि.प. सदस्य, पं.स.चंदगडचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.