कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्याद पिडित महिलेने पोलिसांमध्ये दिली आहे. या प्रकरणी निखिल संजय कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ११ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, पिडित महीला आणि पती यांच्या दोघांमध्ये वाद झाल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास महिला आपल्या दारात बसली होती. यावेळी संशयित आरोपी कांबळे याने महिलेला जबरदस्तीने बोळात नेवून शारीरिक संबंध ठेवले होते. याची माहिती घरात सांगितल्यास नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत.