अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक हमखास सोने-चांदीची खरेदी करतात. पण तुम्हाला माहहती आहे का अक्षय तृतीयालाचं का सोने खरेदी केली जाते..? चला जाणून घेऊया या सविस्तर लेखामध्ये..
अक्षय म्हणजे जे कधीही क्षय पावत नाही आणि कायम राहते. धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीया हा श्रद्धेचा आणि सकारात्मक सुरुवातीचा दिवस आहे आणि या तारखेला त्रेता युगाची सुरुवात झाली, म्हणूनच त्याला युगादितिथी असेही म्हणतात.अक्षय्य तृतीयेचा दिवस सोने आणि चांदी खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. सोने आणि चांदी हे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात, पिवळ्या धातूचे सोने सर्वात पवित्र आणि अक्षय्य मानले जाते.
यासोबतच सोन्याला देवतांचा धातू मानले जाते, त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.त्याच वेळी, पद्म पुराणानुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी, धनदेवता कुबेर याला देवांचा खजिनदार बनवण्यात आले. स्कंद पुराणानुसार अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले सोने समृद्धी आणते. यासोबतच, या दिवशी ग्रहांची शुभ स्थिती देखील तयार होते ज्यामुळे प्रत्येक प्रकारची खरेदी आणि नवीन सुरुवात दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते.