मुंबई – सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत.या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना एक आक्षेपार्य वक्त्यव्य अंगाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर नाची…डान्सर.. बबली.. अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी नवनीत राणांवर टीका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीत संजय राऊतांविरोधात रवी राणा आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संजय राऊतांविरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप महिला कार्यकर्त्यांकडून बॅनरवर शाही फेक

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन भाजप महिला कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या फोटो असलेल्या बॅनरवर शाही फेक करून बॅनरवर जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले.

काय म्हणाले संजय राऊत..?

नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? असं म्हणत शिवसेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यासंदर्भातील केलेल्या विधानाचा पुनरुच्चार केला. सांगलीत संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यातील चर्चेदरम्यान संजय राऊतांनी हे विधान केलंय. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मविआ नेतेही राऊतांच्या या विधानाला दुजोरा देताना दिसतायत. अमरावतीच्या सभेत संजय राऊतांनी खासदार नवनीत राणांवरील केलेल्या टीकेमुळे राऊतांवर टीकेची झोड उठलीय. शुक्रवारी वर्ध्यातील सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना इशारा दिला असून, नवनीत राणांवरील विधानावर महिला उत्तर देतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.