कळे ( प्रतिनिधी ) : सुळे ( ता.पन्हाळा ) येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या ‘क’वर्ग दर्जा प्राप्त ग्रामदैवत श्री.रासाईदेवी मंदिरचा वास्तुशांती व कलशारोहण आज संपन्न झाला . या कलशारोहण सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
सकाळी ४.०० ते ६.०० अभिषेक व महाकाकड आरती, सकाळी ७. ०० ते १०. ०० होम हवन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १०.०० ते ११.०० कलशारोहन व पूजन, दुपारी १.०० वाजता महाप्रसाद, सायंकाळी४. ०० ते ५.०० हरिपाठ, रात्री ९.०० ते ११.०० कीर्तन सोहळा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
या कार्यक्रमास खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार डॉ. विनयरावजी कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष राहुल पी.एन.पाटील तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र यांचे व्यवस्थापनाखालील श्री. रासाईदेवी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती ग्रामपंचायत सुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे