तमिळनाडू : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी विद्या राणी ह्या लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहते. विद्या राणी यांनी भाजप सोडून एनटीसी पक्षात प्रवेश केल आहे. विद्या राणी यांना नाम तमिझार काची(एनटसी) या पक्षाने तिकीट दिले आहे. त्या तमिळनाडूतील कृष्णगिरी या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.

विद्या राणी यांनी 2020 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यांना तमिळनाडू भाजपच्या युवा शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकत एनटीसी पक्षात प्रेवश केला होता. याच पक्षाकडून आता त्या लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

एनटीसी पक्षाने तमिळनाडूत एकूण 40 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या 40 उमेदवारांत अर्धे उमेदवार महिला आहेत. यात विद्या राणी यांचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्या राणी या राजकारणात सक्रिय आहेत.