कोल्हापूर (प्रतिनिधी) : तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या हरकतीच्या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने दिला. म्हणून ३० हजारांची मागणी करून तडजोडी अंती प्रत्यक्षात २५ हजारांची लाच स्विकारताना आज (बुधवार) एका मंडल अधिकाऱ्यांसह दोन कोतलांवर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

अर्चना मिलिंद गुळवणी (वय ४७, पद-मंडल अधिकारी सजा गडमुडशिंगी) वर्ग-३, रा. संभाजीनगर कोल्हापूर), तात्यासो धनपाल सावंत (वय ३८, पद – कोतवाल, सजा वसगडे, वर्ग ४, रा. वसगडे, ता.करवीर) आणि युवराज कृष्णात वड्ड (वय ३५, पद – कोतवाल, सजा गडमुडशिंगी वर्ग ४, रा. गडमुडशिंगी, ता.करवीर) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस उप-अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश मोरे, पो.हे.कॉ. शैलेश पोरे,पो. ना. विकास माने, पो. ना. सुनिल घोसाळकर, पो. कॉ. रूपेश माने यांनी केली.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…..