मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरु आहे. सर्व पक्ष आपल्या तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपला पक्ष कसा मोठा हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार विरोधी पक्ष नेत्यांवर तोंड सुख घेत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील साडेतील शहाण्यांना आव्हान देण्यासाठीच हा साडेतीन मुहूर्तापैकी दिवस निवडला, असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत ..?

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्यातील साडेतील शहाण्यांना आव्हान देण्यासाठीच हा साडेतीन मुहूर्तापैकी दिवस निवडला, असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. सध्या राज्याच्या राजकारणात साडेतीन शहाणे आहेत. असे म्हणत राऊत म्हणाले,

राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी आणि आमच्या घटक पक्षात कोणतेही वाद नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट दिसून येईल, ती एकजूट कायम राहिल, काही लोकांचे मिशन ४८ पैकी ४८ किंवा ४५ पेक्षा अधिकच्या घोषणा करत आहे,महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा टोला लगावत आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वासही राऊतांनी यावेळी व्यक्त केला.