कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरढोण (ता. शिरोळ) येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेले संस्थेचे अध्यक्ष सोहेल बाणदार, संचालक भाऊसो चौधरी, महावीर नारगुडे आणि समीर मुजावरला जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, संस्थेचे इतर संचालक फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

संस्थेचे मयत सचिव अनिल भाऊसो पोवार यांनी विविध स्वरुपात आर्थिक गैरव्यवहार करुन ३७ लाख ८९ हजारांचा अपहार केला आहे. सन २०२० ते २०२४ या आर्थिक वर्षात अपहार केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्याने लेखापरीक्षक सागर सदाशिव यांनी शुक्रवारी येथील पोलिसांत मयत सचिव पोवार व अध्यक्ष बाणदर यांच्यासह तेरा संचालका विरोधात गुन्हा दाखल केला होता.