मुरगूड ( प्रतिनिधी ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज येथे महाहादगा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हस्त देवतांचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, ऋतुजा मोरे, सुहासिनी देवी पाटील, प्राचार्य एस पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात सातशे मुलींनी फेर धरून हादग्याची गाणी गायली. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हादगा सादर करण्याची सोळा वर्षाची परंपरा आज ही या शाळेने कायम जपली आहे. “मुलींनो खूप शिका मोठे व्हायची स्वप्न पहा” असा मौलिक सल्ला यावेळी डॉ. मंजिरी मोरे यांनी आपल्या भाषणात दिला.
तेजस्विनी पाटील यांनी या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी ऋतुजा मोरे यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन कल्पना पाटील, भाग्यश्री ओलेकर यांनी केले, तर आभार लता पाटील यांनी मानले.