मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली अडीच वर्षांनंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होते, त्यांना अर्थ विभागात रस होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत जाऊन अर्थमंत्री,गृहमंत्री.पंतप्रधान होण्याचे स्वप्न होते. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी-शाहांना आवडले नाही. म्हणूनच फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख कापण्यात आले आणि त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्यात आले, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी जे सागंतिले ते शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मी दिल्लीत जाऊन मी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होईल, असे त्यांचे स्वप्न होते. स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठिशी उभे राहतो. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी-शाहांना आवडले नाही. म्हणूनच फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख कापण्यात आले आणि त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्यात आले. जे काही राजकारण आम्हाला कळते, त्यातून हे दिसते”.फडणवीस इतके मोठे स्वप्न पाहायला लागले म्हणून मोदी – शहांनी त्यांना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावले असा टोलाही  राऊत यांनी लगावलाय.