Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#news Archives -

वीज ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये ; महावितरणचे आवाहन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महावितरण मार्फत बसवण्यात येणाऱ्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासानुसार (रियल टाईम) उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर व पर्यायाने वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे. तसेच अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. टीओडी मीटर हे पोस्ट पेड असून मीटर रीडिंगनुसारच त्याचे बिल देण्यात येणार आहे.… Continue reading वीज ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये ; महावितरणचे आवाहन

देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून महिलेची दोन मुलांसह आत्महत्या : परिसर हादरला

देवगड( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या तिर्लोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे पती सुरज भाबल हे मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. श्रिया आपल्या सासू-सासऱ्यांसोबत पिरलोट-आंबेरी येथे राहत होती. १५… Continue reading देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून महिलेची दोन मुलांसह आत्महत्या : परिसर हादरला

पँथर आर्मी तर्फे समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

इचलकरंजी ( प्रतिनिधी ) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 134 व्यक्ती व संस्थांना आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापु) यांच्या शुभ हस्ते समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी सभागृहात समतावादी भारत राष्ट्र गौरव… Continue reading पँथर आर्मी तर्फे समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणार – सुनिल तटकरे

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘आम्ही बाबासाहेबांचे पाईक’ हा विशेष जनजागृतीपर उपक्रम आजपासून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून साकारत असलेल्या या उपक्रमाचे… Continue reading भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणार – सुनिल तटकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे तसेच राज्यातील नागरिकांना डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांनी… Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

संस्कार आणि संस्कृती रुजवण्यासाठी खेळघरचे कार्य उल्लेखनीय : नामदार चंद्रकांत दादा पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : खेळघर परिवार कोल्हापूर हा पालकमंच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने, सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात कार्यरत आहे. खेळघरची स्थापना गुढीपाडवा 27 मार्च 2009 ला झाली. मुलांच्या अध्ययन क्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक पद्धतींची जोड देणे ही खेळघर कार्यपद्धतीची उद्दिष्ट्ये आहेत. आज हॉटेल… Continue reading संस्कार आणि संस्कृती रुजवण्यासाठी खेळघरचे कार्य उल्लेखनीय : नामदार चंद्रकांत दादा पाटील

डी. वाय पाटील साळोखेनगर येथे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कॉम्पिटिशन संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर येथे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कॉम्पिटिशन उत्साहात संपन्न झाली. प्रथम वर्ष अभियांत्रिकी इंजिनिअरिंग विभागामधील विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य विकास करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डी वाय पाटील प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेज साळोखे नगरचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत… Continue reading डी. वाय पाटील साळोखेनगर येथे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कॉम्पिटिशन संपन्न

जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर आता मात करता येणार..!

मुंबई : ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आणि नॅनो पार्टिकल्सचा समावेश असलेले औषध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मसी विभागाने तयार केले आहे. नाकाद्वारे दिल्यानंतर हे औषध थेट मेंदूपर्यंत पोहोचून उपचार करेल, असा दावा करण्यात आला आहे. प्रचलित उपचारांच्या मर्यादा पार… कॅन्सर रुग्णांवर सध्या किमोथेरपी आणि रेडिएशन हेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र,… Continue reading जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर आता मात करता येणार..!

आळते येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदीरात आज हनुमान जयंती निमित्त भाविकांची मांदियाळी..!

हातकणंगले ( प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील क|| आळते येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदीरात आज हनुमान जयंती निमित्त पहाटे पासुनच भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे ६.२० मिनिटांनी श्री हनुमंताचा पाळणा अर्थात जन्म कल्याण सोहळा पार पडला. तत्पूर्वी पहाटे पासुनच काकड आरतीसह भजनाचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान श्री राम नवमी पासुनच या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन… Continue reading आळते येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदीरात आज हनुमान जयंती निमित्त भाविकांची मांदियाळी..!

शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी शिरोळात धरणे आंदोलन..!

शिरोळ ( प्रतिनिधी ) : शिरोळ शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे अपूर्ण पाणी योजना पूर्ण करावी यासाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. प्रशासन यासंदर्भात कोणतीच कारवाई करत नसल्याने शुक्रवारी आंदोलनस्थळी भजनाचा गजर करीत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. दरम्यान मंगळवारपासून पुन्हा टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार युवानेते पृथ्वीराजसिंह… Continue reading शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी शिरोळात धरणे आंदोलन..!

error: Content is protected !!