मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीचे धुमाकूळ राज्यात चालू आहे. काल पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच सर्वाधीक चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे बारामती मतदान संघ. बारामती मतदार संघात माजी कृषी मंत्री शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे यात कोण बाजी मारणार या कडे सर्वांचं लक्ष लागुन राहिले आहे. दोन्ही पवार कुटुंबीयांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान पवार पवार एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका मांडत आहेत.. दोन्ही पवार एकमेंकावर निशाणा साधायचा एक ही संधी सोडायत नाहीयत. त्यात आज अजित काकांवर पुतण्याने विशेष टिपण्णी केली आहे रोहित पवारांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधत .भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची चाल असल्याची टीकास्त्र रोहित पवारांनी अजित पवारांवर सोडले आहे

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा अजित पवार महाराष्ट्रभर फिरायचे, पण सध्या मात्र ते बारामतीत अडकले आहेत असं रोहित म्हणाले. अजित पवार हे शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा महाराष्ट्रभर फिरायचे पण मात्र सध्या ते बारामतीमध्ये अडकलेले आहे. भाजपने अजित पवारांना लोकल नेत बनवलं आहे. शरद पवारांच्या वयासंदर्भात कायम बोललं जातं आज आमचा 70 वर्षाचा य़ुवा नेता राज्यभर 40 ते 50 सभा घेणार आहेत. मात्र अजित पवार फक्त बारामतीत फिरताना दिसत आहे. महाराष्ट्रभर अजित पवारांनी बोलू नये, अशी भाजपती इच्छा आहे. अजित पवारांसंदर्भात राज्यात नकारात्मक वातावरण भाजपमध्ये निर्माण झालं आहे त्यातच बारामतीत अजित पवारांचा उमेदवार तीन लाखांनी मागे दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.