कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील चांदी व्यवसायावर अवलंबून दोन लाख कारागीर आहेत. त्यांच्यासाठी पंचतारांकित औद्योगिक (फाइव्ह स्टार) वसाहतींमध्ये आधुनिक पद्धतीने चांदीचे दागिने निर्मिती करण्याचे कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याची मागणी माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हुपरी येथे गेल्या शंभर वर्षापासून चांदीचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे. चांदी व्यवसायावरती दोन लाख लोकांचा उदरनिर्वाह चालत असून येथे दागिने निर्मिती करण्याची प्रक्रिया परंपरागत पद्धतीने केली जाते. या व्यवसायास उर्जितावस्था येण्यासाठी आधुनिक पद्धतीने दागिने निर्मिती करण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची गरज आहे.

तरी शासनाने हुपरी येथे पंचतारांकित (फाइव्ह स्टार )औद्योगिक वसाहतीमध्ये येथे सिल्वर झोनची निर्मिती केलेली आहे. तसेच या केंद्राला तत्वतः मंजुरी शासनाने दिलेली दिली आहे. तरी हुपरी येथे आरक्षित भूखंडावर कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची मागणी केली.   यावेळी मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उदय वाशिकर उपस्थित होते.