कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ पैकीगडदूवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात झाला. प्रारंभी श्रीकृष्णाची प्रतिमा व गोकुळांची लेझीम वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

गुरुवारी रात्री १२ वा. श्रीकृष्ण जन्मकाळ सोहळा झाला. ‘स्वरसाज’ हा संगीत भजनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला. यामध्ये विलास चौगले,धनाजी पाटील, (सोन्याची शिरोली), संतोष परीट, प्रवीण डाकरे, जयदीप डाकरे, अपूर्वा डाकरे, श्रद्धा सिमाल (सिमालवाडी), रणजित कांबळे, पांडुरंग देसाई, दयानंद सरनोबत इत्यादी कलाकारांनी सहभाग घेतला होता. यावेळी आर. के. देसाई, पत्रकार शिवाजी सावंत आणि परिसरातील भाविक उपस्थित होते.