कोतोली (प्रतिनिधी) : पुनाळ (ता.पन्हाळा) येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज (शुक्रवार) शिवसेनेच्या वतीने ई-श्रम कार्ड महानोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार नेहमीच ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करतो. त्यामुळेच शिवसैनिकांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. तसेच त्यांनी शिवसैनिकांनी असंघटित कामगार क्षेत्रातील काम हाती घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

महानोंदणी कार्यक्रमात ९५० लोकांनी सहभाग घेतला. यावेळी पं.स. सदस्य संभाजी पाटील, युवासेना पन्हाळा तालुका प्रमुख जयराम पोवार, महिला तालुका प्रमुख माया पाटील, उपतालुका प्रमुख प्रशांत पोवार, विठ्ठल पाटील, विभाग प्रमुख अजित पाटील, शाखाप्रमुख सुरेश पोवार, आशोक ङवंग. बाजीराव नांगरे पाटील, संजय कारंडे, सरपंच युवराज पाटील, सुभाष पाटील, मधुकर शिंदे, नारायण सुतार आदी शिवसैनिक उपस्थित होते.