पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आपल्या कोथरूड मतदार संघाच्या विकासासाठी पाटील सदैव तत्पर असतात. आज त्यांनी क्रिएटिव्ह फाऊंडेशन सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून कोथरुड मधील पालकर शाळेला शालेय उपयोगी वस्तूंचे व क्रीडा साहित्यांचे वाटप केले.

चंद्रकांत पाटील यांनी, शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच, शाळा हे विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करून, उत्तम भविष्य घडविणारे केंद्र आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावेत, यासाठी शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल असे उपक्रम राबविले पाहिजेत. मुलांच्या आवडीनुसार कौशल्य आधारित शिक्षण द्यावे, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.