कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे ‘तालुकास्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्कार संजय घोडावत युनिर्व्हसिटी, अतिग्रे येथे समारंभात दै. पुढारीचे चेअरमन योगेश जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संजय घोडावत विद्यापीठाचे प्राचार्य विराट गिरी, शिवाजीराव भुकेले, पत्रकार ताज मुल्लाणी, सुधाकर निर्मळे, दगडू माने आणि असोसिएशनचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

दीनदलित, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे कार्य संतोष तारळे यांनी लेखणीतून केले आहे. महापूर, अतिवृष्टीग्रस्त व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.