१७ जागेसाठी ५६ अर्ज दाखल 

सांगोला/ नाना हालंगडे

सांगोला तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या १७ जागेसाठी दाखल झालेल्या ६० अर्जापैकी ५६ अर्ज वैद्य ठरले तर ४ अर्ज अवैध ( नामंजूर ) झाले आहेत दरम्यान नामंजूर चार अर्जावर येत्या सोमवार १५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. येत्या मंगळवार १६ ते सोमवार ३० जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असुन सोमवार ११ फेब्रुवारी ०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

शेतकरी सूतगिरणीच्या निवडणुकीनंतर आता सांगोला तालुका खरेदी विक्री संघाच्या १७ जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. खरेदी विक्री संघाचे व्यक्तिगत-२१६४ सभासद असून ८३ संस्था सभासद असे एकूण -२२४७ सभासद आहेत. दरम्यान १७ जागेसाठी सोमवार ९ ते १२ जानेवारी या कालावधीत १७ जागेसाठी सर्वसाधारण- १२ जागेसाठी- ३८ अर्ज, महिला प्रतिनिधी – २ जागेसाठी- ६अर्ज, इतर मागासवर्ग- १ जागेसाठी -६ अर्ज , भटक्या विशेष मागास प्रवर्ग-१ जागेसाठी -६ अर्ज, अनुसूचित जाती जमाती- १ जागेसाठी – ४ अर्ज असे एकूण ६० अर्ज दाखल झाले होते दरम्यान सांगोला येथील सहाय्यक निबंध कार्यालयात सहाय्यक निबंध प्रकाश नालवार यांच्यासमोर काल शुक्रवार १३ जानेवारी रोजी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत अर्जाची छाननी झाली यावेळी दाखल ६० अर्जापैकी श्रीरंग गंगाराम माळी यांचे मूळ जात प्रमाणपत्र नसल्यामुळे किसन खंडू माळी सलगरे सलगरे आडनावाचे पुरावे सादर न केल्यामुळे तर निवृत्ती आप्पा फुले यांच्या अर्जावर न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे हरकती घेण्यात आल्यामुळे असे ४ अर्ज नाममंजूर झाले आहेत. येत्या १६ ते ३० जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. १६ जानेवारी रोजी वैद्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल तर ३१ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे तर शनिवार ११ फेब्रुवारी०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.