कोल्हापूर (प्रतिनिधी) : सन २०१९ पासून कोल्हापूर पोलिसांना गुंगारा देणारा फरार मोक्का आरोपी सम्राट कोराणे हा ५ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्वतःहून शरण आला होता. त्यावेळी न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तपास अधिकारी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी तपासासाठी सम्राट कोराणे याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
न्यायालयानं हा अर्ज मंजूर केल्यानंतर पोलीसांनी सम्राट कोराणेला ताबा घेऊन त्याला न्यायालयात हजर केलं. त्यावेळी न्यायालयानं त्याला अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सम्राट कोराणे याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला पुन्हा पंचवीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
Post Views: 22