नांदणी ( प्रतिनिधी ) नांदणी ता. शिरोळ येथील भुपाल माणगावे यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या घरी भेट देत माणगावे यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान या निमित्ताने माणगावे कुटुंबियांनी 91 वा वाढदिवस म्हणून शेट्टी यांच्या हातात 91 हजार रूपयाची लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणी देवू केली.

यावेळी भारवलेल्या शेट्टी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, राजेंद्र माणगांवे यांचा दोन दिवसापुर्वी फोन आला व त्यांनी सांगितले कि साहेब 28 तारखेला वडिलांचा 91 वा वाढदिवस कुटूंबियाच्यावतीने साजरा करणार आहोत आपण सायंकाळी भेट देवून शुभेच्छा देवून जावे. याप्रमाणे नांदणी येथील माणगावेकोडी मळ्यात शुभेच्छा देण्यासाठी गेलो. आई वडील दोघानांही शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या 91 व्या वाढदिवसानिम्मीत माणगावे कुटूंबियाने चक्क लोकसभा निवडणुकीसाठी 91 हजार रूपयाची लोक वर्गणी त्यांनी माझ्याकडे सुपुर्द केली असे ते म्हणाले.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, 2004 पासून हे कुटुंबिय सातत्याने चळवळीसोबत राहिले आहे. गत वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नातवाच्या लग्नातही त्यांनी 51 हजार रूपयाची देणगी दिली होती. आज वडीलांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा राजेंद्र माणगावे यांनी 91 हजार रूपयाची लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणी देवून चळवळीस बळ देण्याच काम केल आहे. चळवळीवर प्रेम करणा-या अशा लोकांमुळेच मी गेल्या 30 वर्षापासून उजळ माथ्याने सांगत आलो आहे कि “मी जन्माला आलो त्यावेळेस माझा हात स्वच्छ होता, ज्यावेळेस शेवटचा श्वास घेईन तेव्हासुध्दा दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही.