हमिदवाडा (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथील दत्तात्रय पुंडलिक शिंदे यांच्या जनावरांच्या गोठयात खेळल्या जात असणाऱ्या  तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये रोख  17 हजार 250  रुपये तसेच 1 लाख 53 हजारांचा मुदेमाल जप्त केला आहे. तर अठरा जणांच्यावर गुन्हा नोंद केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  शिंदेवाडी येथे  दत्तात्रय पुंडलिक शिंदे यांच्या जनावरांच्या गोठयात रणजीत रामचंद्र कलकुटकी वय 38, रा. शाहूनगर, शिंदेवाडी ता.कागल), उत्तम बाळासो रावण (वय 22, रा. मुरगुड ता. कागल), पांडुरंग दत्तात्रय मेतकेकर (वय 52, रा. मुरगुड),  तानाजी आनंदा भोसले (वय 37, रा. पिराचीवाडी) रणजीत मारुती पाटील (वय 34, रा. केंबळी), दिलीप परशुराम वडर (वय 38, रा. व्हनाळी), राम मधुकर मोरबाळे (वय 26, रा. मुरगुड), अनिकेत शशिकांत सोनुले (वय 26, रा. मुरगुड), आनंदा रामचंद्र कणसे (वय 40, रा. शाहुनगर, शिंदेवाडी), जयसिंग दिनकर आरडे (वय 36, रा. दौलतवाडी), धनाजी हरी पाटील (वय 52, रा. मुदाळ ता. भुदरगड) समशेद अजित ताशिलदार (वय 57, रा. मुरगुड), सुशांत सखाराम टिपुगडे (वय 30, रा. मुरगुड), रामदास आनंदा भोसले (वय 40, रा. पिराचीवाडी), प्रविण राजेंद्र शिंदे (वय 32, रा. मुरगुड), अक्षय गणेश भोई (वय 24, रा. मुरगुड), कृष्णात गणपती वाइंगडे (वय 39, रा. मुरगुड) हे अठराजण तीन पानी पत्याचा जुगार खेळत असताना पोलिसांना आढळून आले.

यामध्ये पोलिसांनी रोख रक्कम 17 हजार 250, मोबाईल, मोटरसायकली, असा 1 लाख 53 हजारांचा मुदेमाल जप्त केला. या घटनेची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात झाली आहे.