कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून कळे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सागर शिवाजी कांबळे (वय ३४, रा. सुळे) आणि ज्ञानदेव पंडीत कांबळे (वय ३२, रा. बोलोली, ता.करवीर) अशी दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी दिली.

सुळे येथील हरीजन वसाहत येथे एका झाडाखाली उघडयावर काल (मंगळवार) सायंकाळी मटका जुगार सुरू होता. यावेळी पोलीसांनी छापा मारला असता त्यांच्याकडून एक हजार रुपये, कल्याण मटक्याची चिठ्ठी असा मुद्देमाल जप्त केला.